नागपूर :- तो काळ गेला, नेते म्हणतील ती पूर्व दिशा आता चळवळीतील कार्यकर्ते जे राजकीय निर्णय घेतील तो समाज मान्य करेल कारण समाजाची धुरा चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. ते आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार सभागृहात आयोजित राज्यस्तरीय राजकीय निर्णय मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक उद्धव तायडे, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत सोनवणे (औरंगाबाद) सुनिता धेबाडे (अहमदनगर) पदमा निकम (ठाणे) बौद्ध धर्मा बागडे (नागपूर) अँड सुरेश घाटे , प्रकाश कांबळे, हे होते. प्रास्ताविक देवेंद्र बागडे आणि संचालन प्रा.रमेश दुपारे यांनी तर आभारप्रदर्शन सचिन नगराळे यांनी केले.
याप्रसंगी मान्यवर यांच्या सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव पाटील, भाऊराव बोरकर, गौतम बागडे, चरणदास गायकवाड दामू कावरे प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, वैशाली तभाने, संगिता चंद्रीकापुरे, सुनिता चांदेकर, सविता बोरकर, सुधाकर बोरकर, रामभाऊ वाहणे, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांतून प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.