ना. सुधीर मुनगंटीवार होणार ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित

– दि सीएसआर जर्नलच्या वतीने प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड

– संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार गौरव

चंद्रपूर :- दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. ९ डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ना. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात ना. मुनगंटीवार यांचा विशेष हातखंडा आहे. राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी ना. मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या वन,सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे . मग अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे असो वाघनखे आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार,रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, आपल्या देशातील संसदेला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराला चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि आता घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अश्या निर्णयामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुढाकाराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडल्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी ऊत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कर्तृत्वाचा गौरव

ना. मुनगंटीवार यांना १९९९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन अॉफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन अॉफ द इयर’,महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्‍या प्रतिष्‍ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स’ दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor inaugurates the Armed Forces Flag Day Fund Collection Drive

Thu Dec 7 , 2023
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the Armed Forces Flag Day Fund Collection Drive by making a donation to the Flag Fund at Raj Bhavan Mumbai on Wed (7 Dec). The Flag Day was organised jointly by Mumbai City and Suburban districts on the occasion of Armed Forces Flag Day, which is celebrated every year on 7 December.  Vice Admiral […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com