गडकरींच्या हस्ते सेवाकार्य करणाऱ्या डॉक्टरांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान

 नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा वैद्यकीय क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांना भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पुरस्कार सन्मान सोहळा शनिवारी दि 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी भाजप शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीणजी दटके, राज्यसभा खासदार डॉ विकासजी महात्मे सर डॉ सुभाषजी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारचे स्वरूप सन्मानचिन्ह, धन्वंतरी फोटो,शाल, श्रीफळ असून अनुक्रमे  न्युरोसर्जन  प्रोफेसर डॉ प्रमोदजी गिरी, स्त्रीरोगतज्ञ डॉ शिल्पी सूद, हृदयरोगतज्ञ डॉ वरुणजी भार्गव, बालरोगतज्ञ डॉ वसंतजी खळतकर , ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ वैद्या सौ मीराताई औरंगाबादकर, हेल्थ सिटी रुग्णालयाचे डॉ योगेशजी टेंभेकर, युवा फिजिओ थेरपीस्ट डॉ आलीना घडोळे आदी डॉक्टरांनी  सामाजिक जीवनात, व कोविड काळातील बहुमूल्य सेवाकार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी नितीनजी च्या शुभहस्ते भाजपच्या वैद्यकीय आघाडीने कोविड काळात केलेल्या सेवाकार्य गौरविकेचं प्रकाशन करण्यात आलं. यात वैद्यकीय आघाडीने कोविड काळात रक्तदान, प्लाझ्मादान, कोविड समुपदेशन शिबीर, पोस्ट कोविड केअर सेन्टर, जेष्ठ नागरिकांना लसीकरण फ्री रेजिस्ट्रेशन, वाहन व्यवस्था, जनजागृती,इम्म्युनिटी कीट, आदी कार्यक्रमंच संयुक्तिक छायाचित्रसह अहवाल संपादित केला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीशजी चरडे यांनी केल तर ,कार्यक्रमाचे संचालन आयोजक  महामंत्री डॉ श्रीरंगजी वराडपांडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ ज्ञानेश धाकूळकर, डॉ प्रणय चांदेकर डॉ प्रांजल मोरघडे, डॉ छाया दुरुगकर, डॉ अजय सारंगपुरे, डॉ प्रतीक विश्वकर्मा, डॉ अशोक पाटील, समस्त वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी यांनी केले..
दिनेश दमाहे, 9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पुजा कावळे हत्याकांडातील पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट, आरोपीतांना यवतमाळ जिल्हा पोलीसां 72 तासाच्या आत केले जेरबंद.

Sun Nov 21 , 2021
यवतमाळ.-दि.10/11/2021 रोजी मृतक नामे सौ. पुजा अनिल कावळे वय 28 वर्षे रा. शेलोडी ता. दारव्हा जि. यवतमाळ ह.मु. वाई-गौळ ता.मानोरा जि. वाशिम ही सायंकाळी 5.30 वा. पुणे जाणे करीता घरुन निघाली परंतु ती पुणे येथे पोचली नाही. त्यामुळे फिर्यादी नामे भोजराज पंजाबराव वानखडे यांचे तक्रारी वरुन हरविलेले ईसम रजि.क्र. 48/2021 अन्वये पोलीस स्टेशन्न दिग्रस येथे मिसिंग दाखल करुन तीचा कसोशीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com