नागपूर – नागपूर सुधार प्रन्यास येथे विष्वस्त मंडळाची १२०० वी सर्वसाधारण सभा आज बुधवार, दिनांक ०२ मार्च २०२२ रोजी पार पडली. सदर स्थित नासुप्र’च्या मुख्यालयात पार पडलेल्या या सभेत नासुप्रचे सभापती तथा ‘नामप्रविप्रा’चे आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.), नासुप्र विश्वस्त व पश्चिम नागपूरचे आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नासुप्र विश्वस्त व स्थायी समिती सभापती मा. श्री. प्रकाश भोयर, नगर रचना विभागाचे सह संचालक श्रीमती सुप्रिया थुल, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संजय बंगाले, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संदीप ईटकेलवार उपस्थित होते. या सभेत विश्वस्त मंडळाने विविध विषयांना मान्यता प्रदान केली. मंजुरी प्रदान करण्यात आलेले विषय पुढील प्रमाणे आहे.
विषय ०१
विविध ई-निविदा सुचनान्वये रू. 50.00 लक्ष पेक्षा जास्त प्राक्कलन राशीची/ कंत्राट राशीची एकूण १० कामे वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्द करून आमंत्रित करण्यात आल्या होत्या सदर कामांची निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दारानें सादर केलेल्या निम्मंतम दरास मान्यता प्रदान करावयाचा विषय मा. विश्वस्त मंडळा समोर सादर करण्यात आला मा. विश्वस्त मंडळाने १० कामाच्या एकूण रु. ९. ८६/- कोटी या कंत्राट राशीस विश्वेशरय्या राष्ट्रीय प्रघोगिकी संस्थान, नागपूर (VNIT) कडून तपासण्याच्या अधीन राहून मान्यता दिली.
विषय ०२
नागपूर सुधार प्रन्यास द्वारे नागपूर शहरात विविध ठिकाणी जन सुविधा केंद्र तयार करण्याकरिता नासुप्र ला आर्थिक दृष्ट्या शक्य होईल अशा ठिकाणी जन सुविधा केंद्र तयार करण्याचे मा.सभापती यांनी निर्णय घेण्याबाबत विश्वस्त मंडळांने मंजुरी दिली आहे .
विषय ०३
हॉट मिक्स प्लांट करिता डांबराची प्राक्कलन राशी रु. ८१ . १३ /- लक्ष या राशीत कंत्रात देण्यात आला होता यामध्ये ३५. ३३ टक्के (रु. २८. ६६/- लक्ष ) एवढी बचत झाली आहे. तसेच ५७२ लेआऊट निधी अंतर्गत सिव्हर लाईन प्राक्कलन राशी रु. ५ . ९१ /- लक्ष या राशीत कंत्रात देण्यात आला होता यामध्ये ६६. ९८ टक्के (३. ०४ /- लक्ष ) एवढी बचत झाली असून अंतिम देयकांच्या प्रदानास मंजूरी देण्यात आलेली आहे.
विषय ०४
विविध ई-निविदा सुचनान्वये रू. 50.00 लक्ष पेक्षा जास्त प्राक्कलन राशीची/ कंत्राट राशीची प्राप्त निविदा परीचलन पध्दतीने मंजुरी दिल्याचे नोंद घेण्यात आलेली आहे.
विषय ०५
विकास योजना – नागपूर
नागपूर मंजुर विकास योजनेत मौजा चिखली (खुर्द), खसरा क्र. 21/2 येथील क्षेत्र 2.22 हेक्टर आर. व खसरा क्र. 21/4 मधील क्षेत्र 2.05 हे.आर. अशी एकूण 5.27 हे.आर जागा ‘‘कृषी’’ उपयोग महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 37 अन्वये निवासी उपयोगात समाविष्ट करण्याचे कार्यवाहीस मान्यता देण्यात आलेली आहे.
विषय ०६
पंजाब नॅशनल बॅंक यांनी खसरा क्र. 63,67,69 मौजा चिखली(देव) येथील भूखंड क्र. 101 अनधिकृतपणे विक्री केल्याबाबत श्री कमलेश शांतीलाल शाह यांचा दि. 23.07.2021 चा अर्जावर प्रशासनाने योग्य नियमानुसार निर्णय घ्यावे असे विश्वस्त मंडळाने निर्णय घेण्याचे सुचविले आहे.
विषय ०७
सती माता शिक्षण संस्था यांना खसरा क्र. 11,12 मौजा परसोडी येथील जागा शाळा चालविण्याकरीता उपलब्ध करून देण्याकरिता यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या जागा परत घेऊन सादर प्रस्ताव शासनास पाठविण्या करिता मंजुरी देण्यात आलेली आहे.
विषय ०८
नासुप्रच्या अभिन्यासातील भूखंडाच्या लगतची अतिरिक्त जागा वाटपाबाबत विविध विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर विषय पुढील सभेत मांडण्यात यावे.
विषय ०९
नागपूर सुधार प्रन्यासचे मालकीचे उत्तर अंबाझरी मार्गावरील सांस्कृृतिक संकुलाचे देखभाल, दुरूस्ती व संगोपणा संबंधात वार्शीक षुल्क माफ करणे, भविश्यात उक्त प्रकल्प उत्पन्नाचे 50-50 बेसीस तत्वावर चालविणे आणि सदर प्रकरणात आर्बिट्रेटर ची नियुक्ती करण्याबाबत शासनाने कोविड- १९ संदर्भात दिलेल्या मार्गदर्शन सुचणेनुसार कार्यवाही करण्यात यावी. 

विषय १०
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी येथील भक्त निवास इमारत हॉस्पीटलसाठी संस्थेला देण्याकरिता सर्व विश्वस्तानीं नासुप्र चे सभापती यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
विषय ११
नासुप्र अधिनियम 1936 चे कलम 21-अ मधील तरतुदीनुसार सन 2022-23 मध्ये सुरू ठेवावयाच्या पदांची माहिती शासनास पाठविण्याबाबत विश्वस्तांनी मंजुरी दिली आहे.
विषय १२
महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, 2001-प्रशमन शुल्क व विकास शुल्क नियमितीबाबत, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचे दि. 18.10.2021 च्या आदेशाप्रमाणे विकास शुल्काचे ३ पट आकारण्याबाबद विश्वस्थांनी विरोध दर्शविले असून या बाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याबाबत सुचविले आहे.
विषय १३
महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) सुधारीत अधिनियम 2021 च्या अधिसूचनेनुसार करावयाच्या कार्यवाही बाबत नागपूर शहराच्या अंतर्गत येत असलेल्या दिनांक ३१/१२/२०२० पूर्वीच्या रेखांकन व विक्री केलेले भूखंड नियमितीकरण करण्यास पात्र असणाऱ्या भूखंड नियमांच्या अंतर्गत नियमित करण्यास मंजुरी दिली या करिता नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावे लागेल
विषय १४
मौजा दाभा, खसरा क्र. 171/5/1 या जागेवरील प्राथमिक शाळा (एम.डब्ल्यू-60) क्षेत्र 4376.00 चौ.मी. आणि माध्यमिक शाळा (एम.डब्ल्यू-61) क्षेत्र 5517.00 चौ.मी. या सार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे जागा भिवसेन खोरी या क्षेत्रा लगत आहे. या जागेवर अंदाजे २५००-३००० झोपडपट्टी धारकांचे वास्तव्य आहे. या लोकांची मुले शिक्षणा पासून वंचित आहे. त्यामुळे या जागेवर शैक्षणिक संस्थेस शैक्षणिक प्रयोजना करिता वाटप झाल्यास येथील नागरिकांचे मुले शिक्षणा पासून वंचित राहणार नाही. त्यामुळे भिवसेन खोरी येथील नागरिकांच्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्याच्या अटींवर सदरहू भूखंडाचे वाटप श्री व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ यांना करण्याबाबत विश्वस्त मंडळाने मान्यता दिली.
विषय १५
नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकार क्षेत्रातील प्रस्तावित इमारत नकाशे मंजुर केल्यानंतर इमारत बांधकाम मंजुरीकरीता किस्तीने भरणा करावयाच्या शुल्काची मुदत संपल्यानंतर उर्वरीत शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ तसेच विकासकाने काविड-19 महामारीच्या शासन निर्णयाप्रमाणे आकारण्यात येत असलेल्या व्याज माफ करण्याबाबत केलेल्या विनंतीवर शासनाने कोविड- १९ संदर्भात दिलेल्या मार्गदर्शन सुचणेनुसार कार्यवाही करण्याबाबत मान्यता दिली.
विषय १६
नागपूर सुधार प्रन्यासच्या वांजरा येथील हॉट मिक्स प्लॅन्ट अंतर्गत खडी पुरवठयाच्या कार्यादेशची मुदतवाढ व अतिरिक्त कंत्राट राशीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.
विषय १७
नागपूर सुधार प्रन्यास तथा नागपूर महानगरपालिका यांचे हद्दीवरील खाजगी अभिन्यास मंजुर करतांना, अभिन्यासाचे क्षेत्र ज्या नियोजन प्राधिकरणाचे क्षेत्रात ५० टक्के पेक्षा जास्त येत असेल त्या नियोजन प्राधिकरणाने अभिनयास मंजूर करून अन्य नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील क्षेत्राकरीता विकास निधी वळता करण्याबाबत मान्यता दिली.
विषय १८
नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मे. इंडस्ट्रीयल सिक्युरिटी सर्व्हीसेस, नागपूर यांचेकडून निविदाद्वारे घेण्यात आलेल्या संगणकचालक व विजयंत्री यांचेवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चास मंजुरी प्रदान करण्यात आली.
विषय १९
नागपूर सुधार प्रन्यास चे हॉट मिक्स प्लॅट, कळमना येथील जुनी वाहने व मशिनरीज व ईतर साहित्य विक्रीसाठी दि. 10.02.2022 ला झालेल्या जाहिर लिलावात महत्तम बोली बोलणाऱ्या व्यक्तींचे नावे विक्रीच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त ……
नासुप्र शहरातील विविध ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या उद्यानाची देखभाल व दुरुस्ती नासुप्र तर्फे करण्यात येत होती. सदर उध्याने नासुप्र कायदा १९६६ कलम ५७ अन्वये एकूण ५१ उद्याने दिनांक १६-०६-२०२० नागपूर महानगर पालिका, नागपूर ला सुस्थितीत हस्तांतरण करण्यात आलेली होती. हस्तांतरित करण्यात आलेल्या उद्यानांची मनपाद्वारे देखभाल योग्य रित्या होत नसल्याची नागरिकांकडून लोकप्रतिनिधीं व विश्वस्तांना कडे मोठ्याप्रमाणात व दैनिक वृत्तपत्रात उद्यानांची दुरावस्था झाल्या बाबत वेळोवेळी लेख प्रसिद्ध होत आहे. याची नोंद घेऊन आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नासुप्र विश्वस्त व स्थायी समिती सभापती मा. श्री. प्रकाश भोयर, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संजय बंगाले, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संदीप ईटकेलवार यांची समिती स्थापन करण्याचे ठरविले आहे.