संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत महिलांना कर्जवाटप निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार

नागपूर :- नागपूरस्थित निर्मल अर्बन को-ऑप बँक, नंदनवन शाखेच्या वतीने खास महिलांसाठी संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत सहा महिलांना प्रत्येकी ५० हजार प्रमाणे ३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या योजनेचे उद्दिष्ट महिलांच्या आर्थिक उत्थानास चालना देणे हे आहे.

रिझर्व्ह बँकेच्या १६ जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार बँकेच्या संचालक मंडळाने ४.१२.२०२३ चा सभेमध्ये संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत कर्जवितरण करण्याचे ठरविले होते. या योजनेअंतर्गत घरगुती गरजा, गृह उद्योगाला चालना देऊन महिलांचा त्यांचे कुटुंबात आर्थिक वाटा उचलनेकरिता कर्ज वाटप केले जाते.

या प्रसंगी बँकेच्या अध्यक्षा पूजा मानमोडे, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बरडे, एजीएम यादव तसेच अधिकारी प्रदीप गेडाम, सिद्धार्थ भोतमांगे, मकरंद माताडे, पंकज गौळकर, भाग्यश्री झाडे व सोनल बावणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या योजनेला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रसंगी कर्जखात्याचे पासबुक व एटीएम लाभार्थीना सुपूर्द करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुंदरकांड पाठ के साथ राम-जानकी विवाहोत्सव आरंभ

Mon Dec 18 , 2023
– 17 को होगी हल्दी, मेहंदी – 18 को निकलेगी रामजी की बारात नागपुर :-सिया रघुवीर सेवा फाउंडेशन के तत्वावधान में श्री राम-जानकी विवाह उत्सव शक्ति धाम राम मंदिर, प्रेमनगर में श्री गणेश पूजा व सुंदरकांड के पाठ के साथ धूमधाम से आरंभ किया गया। इस अवसर पर अनेक रामभक्त उपस्थित थे। सुंदरकांड पाठ मदन दुबे एवं सहयोगी ने गाकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com