संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नूतन सरस्वती शाळेत शिकणारा दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी हा सकाळी 9 वाजता ऑटो रिक्षाने शाळेत जाऊन दुपारी साडे 12 वाजता कुंभारे कॉलोनी येथील राहत्या घरी परतला. सायंकाळी सहा वाजता सदर मुलाची आई कामावरून घरी परतल्यावर मुलगा घरी न दिसल्याने सर्वत्र शोधाशोध करून चौकशी केली मात्र कुठेही थांगपत्ता लागलेला नाही त्यामुळे कुणीतरी अज्ञात इसमाने सदर मुलाची फूस लावून पळवणूक केल्याची घटना काल दुपारी साडे बारा ते सायंकाळी साडे सहा दरम्यान घडली.बेपत्ता झालेल्या या अल्पवयीन मुलाचे नाव वंश प्रवीण मेश्राम रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.यासंदर्भात फिर्यादी (आई)निशा प्रवीण मेश्राम ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.