संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरातील आंबेडकर चौक येथील राष्ट्रीय महामार्गा वरील पंजाब नेशनल बँक मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी युपीएस च्या नऊ बॅटऱ्या चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार गुरवार (दि.४) जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता बँकेच्या दाराला कुलुप लाऊन बँकेचे सीनीयर मॅनेजर लक्ष्मण गणपती पराते वय ५४ रा. हुडकेश्वर नागपुर आणि त्यांचा स्टाप घरी गेला. शुक्रवार (दि.५) जानेवारी ला सकाळी १० वाजता दरम्यान लक्ष्मण पराते बँकेत कामावर गेले असता बँकेचा चपराशी याने सागिंतले की, काहीतरी बँके मध्ये गडबड झाली आहे.त्यावरून लक्ष्मण आणि स्टाफ ने मिळुन बँकेत पाहणी केली असता बँके मध्ये फाईल वगैरे अस्ताव्यस्त पडुन होत्या व लाकडाची खिडकी तुटलेली दिसल्याने बँके मध्ये चोरी झाल्याचे समजले.
कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या आत प्रवेश करून एकुण ०९ युपीएस च्या बॅटऱ्या प्रत्येकी किंमत ७२४८ रु प्रमाणे एकुण ६५,२३२ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी लक्ष्मण पराते यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात हवालदार सतिश फुटाणे हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.