नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये नागपुरातील नीलेश जोशी ‘खासदार श्री’ ठरला. फुटाळा तलाव येथे ही स्पर्धा पार पडली.
८५ किलोवरील वजनगटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत नीलेश जोगी ने खासदार क्रीडा महोत्सवातील ‘‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ म्हणून बहुमान मिळविला. अकोला येथील उमेश भाकरे उपविजेता ठरला. ८५ किलोवरील वजनगटामध्ये नागपूर येथील रवींद्र ठाकरे ने तिसरे स्थान पटकाविले.
वजनगट ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ आणि ८५ किलोवरील अशा आठ वजनगटामध्ये ही स्पर्धा पार पडली. ८५ किलो वजनगटामध्ये अकोला येथील उमेश भाकरे ने पहिले, बुलढाणा येथील मोहम्मद तन्वीर ने दुसरे आणि नागपूर येथील गुलशन सिंग सिद्धु ने तिसे स्थान प्राप्त केले. ८० किलो वजनगटामध्ये अकोल्याच्या सोहेल शेख ने प्रथम, नागपूर येथील अक्षय प्रजापती ने द्वितीय आणि अकोला येथील शुभम यादव ने तृतीय स्थान पटकाविले.
विजेत्यांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस आणि नागपूर सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार विकास कुंभारे, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, नीरज दोंतुलवार, सतीश वडे, विशाल लोखंडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिनेश चावरे, प्रितम पाटील, टिक्कु शिंदे, अविनाश लोखंडे, अभिषेक कुरीयमवार यांनी जबाबदारी पार पाडली.
निकाल
५५ किलो वजनगट : आशिष बिरीया (चंद्रपूर), अनिकेत मराठे (अकोला), विशाल छिडाम (नागपूर)
६० किलो वजनगट : संकेत भगत (चंद्रपूर), अनूप बांनेत (अकोला), दत्तात्रय सावरकर (बुलढाणा)
६५ किलो वजनगट : संदीपसिंग ठाकूर (अकोला), प्रवीण घोरमोडे (अमरावती), सय्यद खुर्राम (अकोला)
७० किलो वजनगट : शाहबाज हुसैन (नागपूर), विक्रांत गोडबोले (नागपूर), ऋषिकेश देशमुख (अकोला)
७५ किलो वजनगट : योगेश शेंडे (नागपूर), शोयब अहमद खान (अकोला), फारुख शेख (अकोला)
८० किलो वजनगट : सोहेल शेख (अकोला), अक्षय प्रजापती (नागपूर), शुभम यादव (अकोला)
८५ किलो वजनगट : उमेश भाकरे (अकोला), मोहम्मद तन्वीर (बुलढाणा), गुलशन सिंग सिद्धु (नागपूर)
८५ किलोवरील वजनगट : नीलेश जोगी (नागपूर), आकाश राजपूत (अमरावती), रवींद्र ठाकरे (नागपूर)