– संदीप कांबळे,कामठी
स्लग-डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान-सुरेशभाऊ भोयर
कामठी ता प्र 3: –कामठी नगर परिषद मध्ये मागील कित्येक वर्षांपासून कांग्रेसची एकहाती सत्ता असल्याची परंपरा अजूनही कायम असून मागिल 15 वर्षे सतत आमदारकीचा उपभोग घेतलेल्या चंद्रशेखर बावनकुळेला नगर परिषद मध्ये भाजप ची सत्ता बसविण्यात यश आले नाही.कामठी शहर हे कांग्रेसचा गढ आहे ,कामठी तालुक्यात कांग्रेस पक्षाचा मोठा जनाधार आहे .सर्वसामान्य माणसाच्या समस्येला न्याय देण्यासाठी व लोकोपयोगी कामे करण्यासाठी कांग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत तर आगामी कामठी नगर परिषद निवडणुकीत सर्वेक्षण करूनच जनाधार असलेल्या कार्यकर्त्याना उमेदवारी देऊ तसेच डिजिटल नोंदनी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान असल्याचे मौलिक प्रतिपादन कांग्रेस चे माजी महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी कामठी येथील नगर कांग्रेस कमिटी कार्यालय येथे आयोजित कांग्रेस पक्षाचे डिजिटल मेम्बरशीप अभियान कार्यक्रमात व्यक्त केले.दरम्यान कांग्रेस चे नागपूर (ग्रा)जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी समयोचित असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी अध्यक्ष शकुर नागाणी, युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मो इर्शाद शेख, डिजिटल नोंदणी अभियान इंचार्ज राहूल साळवे, धीरज यादव, कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, कांग्रेस चे नागपूर जिल्हा महासचिव मो आबीद भाई ताजी, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, कामठी पंचायत समिती चे उपसभापती आशिष मल्लेवार, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापतो , तसेच माजी नगरसेवक रमेश दुबे, मो उबेद सईद अफरोज, नितेश यादव,यासह नगरसेवकगण व पदाधिकारी , कार्यकर्तागण प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेशभाऊ भोयर यांनी केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर कडाडून टीका केली.नोटबंदी सारख्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस धरल्या गेला.कांग्रेस सरकारने उभ्या केलेल्या कंपन्या मोदिने विक्रीस काढल्या .या भागातील घरकुलचे प्रश्न असो वा पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह येथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी कांग्रेस पक्ष नागरिकांच्या पाठीशी सदैव उभा आहे.याप्रसंगी डिजिटल नोंदणी करण्यात मोलाची प्रगतिशील कर्तव्यदक्ष भूमिका बजवणाऱ्या धीरज यादव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला.
सभेचे संचालन व आभार प्रदर्शन कांग्रेस कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव यांनी केले.,कार्यक्रमाला मोठ्या संख्येत कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्तागण उपस्थित होते.
आगामी नगर परिषद निवडणुकीत जनाधार असलेल्या कांग्रेस कार्यकर्त्यालाच उमेदवारी देणार-माजी जि. प. अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com