– अध्यक्षपदी श्रीराम बापूराव कुलकर्णी तर सचिवपदी दिलीप मनोहर शहाकार यांची निवड
नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी येथे नवनिर्वाचित कार्यकारणी मंडळ गठीत गणेश मंदिर टेकडी नागपूर येथे शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी, ॲड भानुदास कुलकर्णी निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवार्षिक 2024 ते 2029 या कालावधी करिता निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत उमेदवार म्हणून अध्यक्षपदी श्रीराम बापूराव कुलकर्णी तर सचिवपदी दिलीप मनोहर शहाकार यांची निवड झाली आहे.
पदाधिकारी व विश्वस्त मंडळाची नावे अध्यक्ष श्रीराम बापूराव कुलकर्णी, उपाध्यक्ष अरुण गोविंदराव व्यास, सचिव दिलीप मनोहर शाहाकार, सहसचिव सुनील शंकरराव अग्निहोत्री, कोषाध्यक्ष हरी लक्ष्मण भालेराव यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आणि विश्वस्त मंडळाची नावे -अरुण दसराव कुलकर्णी, लखीचंद मारोतराव ढोबळे, किसन गोपाल चुनीलाल गांधी, माधव रामदास कोहळे, प्रल्हाद मारोतराव पराते, आणि अविनाश वासुदेव जावडेकर यांची निवड करण्यात आली. असे प्रसिद्धी पत्रकार नवनिर्वाचित सचिव दिलीप शहाकार यांनी कळविले आहे.