मुंबईच्या विकासासह अनेक विषयांवर न्यूझीलँडच्या पंतप्रधानांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा

– बदलत्या मुंबईवर पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त

मुंबई :-  मुंबईच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी मुंबईच्या बदलेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्सुकतेने जाणून घेतले. राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यूझीलँडच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चाही केली.

मुंबई झोपडीमुक्त करून या महानगरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या योजना, त्याचप्रमाणे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. प्रामुख्याने डीप क्लीनसारख्या मोहिमेतून मुंबईची अंतर्गत स्वच्छता कशी करण्यात येत आहे तेही पंतप्रधानांनी उत्सुकतेने जाणून घेतले. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू यामुळे वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत झाली आहे तसेच मेट्रोमुळे दैनंदिन प्रवासी वाहतूक कशी सुधारत आहे याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरणाचा प्रश्न महत्त्वाचा असून यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील न्यूझीलँडच्या पंतप्रधानांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून योगाचा प्रसार व्हायला पाहिजे यासारख्या विषयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.

यावेळी पंतप्रधानांसमवेत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने देखील हरित ऊर्जा, क्रीडा, शिक्षण,कृषी तंत्रज्ञान,मत्स्यपालन, यांसह विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी आयोजित स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, तर न्यूझीलँडच्या वतीने भारतीय वंशाचे माजी गव्हर्नर जनरल सर आनंद सत्यानंद, क्रिकेटपटू एजाज पटेल, पंतप्रधान कार्यालयाचे माध्यम अधिकारी मायकेल फोर्ब्स, अतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, न्यूझीलंड पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी मॅट यंग, समाजमाध्यम सल्लागार जेकब ओ’फ्लाहर्टी, मार्क टॅलबोट, न्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त पॅट्रिक राटा, जोआना केम्पकर्स, मॅथ्यू आयर्स, मुंबईतील उप-उच्चायुक्त ग्राहम राऊस व उद्योजक हे देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सागरमाला प्रकल्पातील कामे वेगाने - बंदरे विकास मंत्री नितेश राणे

Thu Mar 20 , 2025
– पर्यावरणविषयक परवानग्यावेळेत मिळविण्यावर भर नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण विषयक परवानग्या वेळेत मिळवून सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा 100% टक्के वापर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. विज्ञान भवन येथे राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. त्यावेळी राणे बोलत होते. या बैठकीस केंद्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!