ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

– युवक-युवतींना मिळणार परिपूर्ण माहिती

– इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

 मुंबई  : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवक -युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने नवीन वेबपोर्टल www.msobcfdc.org तयार करण्यात आले आहे.ओबीसी युवक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माहितीसाठी या  वेबपोर्टलला भेट द्यावीअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

          मंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या www.msobcfdc.org या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयासमोरील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूरकौशल्य विकास अधिकारी विजय काटोलकर यावेळी उपस्थित होते.

          वडेट्टीवार म्हणालेमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे.इतर मागासवर्ग प्रवर्गातील परंपरागत व्यवसायात असलेल्या व्यक्तींनाही या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेवून व्यावसायिक स्पर्धेत उतरता येईल. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना महामंडळाच्या थेट कर्ज योजना व व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून व्यवसायदेखील उभा करता येईल.  या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्ष वयोगटातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना घेता येवू शकतो.अधिक माहितीकरिता www.msobcfdc.org या वेबपोर्टलवरील कौशल्य प्रशिक्षण योजना या लिंकला भेट द्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राजीवजींचे विचार, धोरणे जनतेपर्यंत पोहोचवा - कृष्णा अल्लावरू

Thu May 12 , 2022
युवक काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना आवाहन नागपूर –  काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आपल्याला दिलेला विचार, त्यांची ध्येयधोरणे, युवकांना राजकारणात दिलेली भागीदारी, आयटी क्षेत्रातील क्रांती, पंचायत राज लागू करण्याचा निर्णय या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.पक्ष, संघटनेसाठी जोमाने काम करा, त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल, आपसांत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!