नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा ‘असा’ आहे प्लॅन

नागपूर :- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवीन नागपूरच्या संकल्पनेला नव्या वर्षात वेग येणार आहे. एनएमआरडीए क्षेत्रातील 24 गावांमध्ये 1 हजार 353 कोटी रुपयांतून एक हजार किमीचे जलवाहिनी, सिवेज लाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा 24 गावांतील साडेआठ लाख नागरिकांना लाभ होणार आहे.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचा (NMRDA) 1 हजार 353 कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव नगरविकास विभागाने मागील वर्षी मंजूर केला होता. यातील कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली. टेंडरवर निर्णय घेण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत टेंडरला मंजुरीनंतर पुढील महिन्यांत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या अमृत-2 या योजनेंतर्गत एनएमआरडीएच्या सेक्टर साऊथ बी सेक्टरमध्ये समावेश असलेली 13 व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या 11 गावांमध्ये विकासकामे होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ 81 चौरस किमी क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत साऊथ बी सेक्टरमध्ये 565.25 कोटींच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात येणार आहे. एकूण 565 किमीचे जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येणार आहे. यात साथऊ बीमध्ये 220.90 कोटी तर ईस्ट एमध्ये 344.36 कोटी खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय 788.87 कोटींचा सिवेज लाईनचे जाळे पसरविण्याचाही प्रकल्प आहे.

दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह 522 किमी अंतराच्या सिवेज लाईन तयार करण्यात येणार आहे. यातील साऊथ बीमध्ये 220 तर ईस्ट एमध्ये 302 किमीच्या सिवेज लाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. या सर्व कामांच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. टेंडर मंजुरीनंतर कार्यादेश दिले जाणार असून, पुढील महिन्यात भूमिपूजन होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन 'इलेक्शन मोडवर '

Fri Dec 29 , 2023
 राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने दायित्व द्यावे  मनुष्यबळ लपविणाऱ्या विभाग प्रमुखावर कारवाई  नेमणुका बदलविण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर कारवाई   यादीमध्ये मृतकाचे नाव आल्यास ग्रामसेवक जबाबदार नागपूर :- आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढणे, निवडणुकांमध्ये अधिकाधिक पारदर्शिता, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, गतिशील कामे यासोबतच राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व पूर्ण करावे, जिल्ह्यात आज पासून निवडणुकीच्या कामाची सुरुवात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!