नेहरु युवा केंद्र गडचिरोली तर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज मागवणे सुरू

गडचिरोली : भारत सरकार युवक, युवतींना स्वयंसेवक म्हणून संधी देऊन त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी शोधत आहे. या उपक्रमा अंतर्गत स्वयंसेवक म्हणून युवकांना सामाजिक क्षेत्रात जसे की आरोग्य, स्वच्छता, साक्षरता, लिंग समानता, आणि इतर सामाजिक समस्याबद्दल, मोहीमा व जागरूकता विषयी कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास सांगितले जाईल. आणि आपत्कालीन परिस्थितीत किंवा विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी देखील बोलावले जाईल.

यासाठी पात्रता ही उमेदवार किमान १० उत्तीर्ण, गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असावा, दि. १ एप्रिल २०२३ रोजी वय १८ ते २९ दरम्यान असावे. नियमित विद्यार्थी तसेच इतरत्र नोकरी करणारे अपात्र राहतील. मानधन- ५०००/- प्रति महिना. हे सशुल्क रोजगार नाही किंवा स्वयंसेवकाला सरकारकडे नोकरीचा दावा करता येणार नाही. सदरील भरती ही दोन वर्षासाठी राहील. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. त्यासाठी विभागाच्या www.Nyks.nic.in या वेबसाईट वर फॉर्म भरावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ९ मार्च २०२३. अधिक माहितीकरिता कार्यालयीन वेळेत ( 10 ते 5 ) नेहरू युवा केंद्र गडचिरोल, जिल्हा कार्यालय, साईनाथ मेडिकल स्टोअर च्या मागे, रिलायन्स पेट्रोल पंप जवळ, चंद्रपूर रोड गडचिरोली येथे, email- qnykgadchiroli @gmail.com 07132-295089 किंवा 9130916523 / 9422685154 ह्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन  अमित पुंडे, जिल्हा युवा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

थोर संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Thu Feb 23 , 2023
नागपूर : सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली याप्रसंगी नागपूर महानगरपालिका नेहरूनगर झोनचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सोनू बागडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक खरे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com