दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- अनेक दिव्यांग व्यक्ती कला – क्रीडा क्षेत्रात सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक प्राविण्य मिळवतात. काही कलाकार पायाने पेंटिंग करतात, तर काही दातांनी ब्रश धरून पेंटिंग करतात. पायाने सुईमध्ये धागा ओवण्याची क्षमता असलेली दिव्यांग व्यक्ती देखील आपण पाहिली आहे. स्पेशल ऑलिम्पिकमध्ये दिव्यांग अनेक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत आहे. दिव्यांगांना सहानुभूती नको, तर योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

जोगेश्वरी मुंबई येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब) या संस्थेचा उपक्रम असलेल्या ‘एम एन बनाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड’ या संस्थेतील युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. ६) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

संसदेमध्ये पारित झालेले दिव्यांग व्यक्तींचे विधेयक आपल्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने तयार केले होते, असे नमूद करून दिव्यांगांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे राज्यपालांनी सांगितले.

बस स्टेशन, रेल्वे स्टेशन्स, शासकीय कार्यालये, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्था दिव्यांगांकरिता प्रवेश व प्रवासाच्या दृष्टीने सुलभ असल्या पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी ‘नॅब’च्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, समाजसेविका बबिता सिंह, क्रीडा प्रशिक्षक चार्ल्स आदींनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

दिव्यांग व्यक्तींनी यावेळी स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू राज्यपालांना भेट दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय स्तरावर क्षमता बांधणी कार्यशाळेत मनपाचे कौतुक

Sat Oct 7 , 2023
नागपूर :- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि क्षमता बांधणी आयोग (सीबीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्षमता बांधणी कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेवर कौतुकाची थाप पडली. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे गुरूवार ५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com