अमरदिप बडगे, प्रतिनिधी
पोषण आहार सप्ताह व पंधरवडा
गोंदिया :- बालकांच्या सर्वेक्षण व हीत जोपासना साठी सर्व जनप्रतिनिधि, अधिकारी आंगनवाडी सेविका मदतनीस, समाजसेवक यांनी एकत्रितपणे ऐण्याची गरज आहे. सन १९७५.७६ पासून शासनाने कुपोषित मुक्त भारत व लहान ०ते 3 ते6 या बालकांना योग्य आहार मिळावा व माता ,गरोदर स्त्रिया, अती तिव्र वजनाच्या बालक यानां ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजना चा फायदा झाला पाहिजे. व उतकुष्ट आहार देणे बालकांच्या हितासाठी सर्वानी एकत्र येणे हि काळाची गरज असुन लोकचळवळ ही झाली पाहिजे असे वडेगाव येथील आंगनवाडीत पोषण आहार सप्ताह उदघाटन करते वेळी मार्गदशानातूनजिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले .या कार्याक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद सदस्य तुमेशवरी बघेले,व सभापती बांधकाम संजय टेभंरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहूने सभापती कुंता पटले,उपसभापती हुपराज जमईवार, अँन्ड माधुरी रांहगडाले, पंचायत समिती सदस्य तेजराम चौव्हान, डॉ. चैतलाल भगत,जयप्रकाश पटले,संरपच डीलेश्वरी गौतम, मिनाक्षी जगने उपसंरपच, सुनीता मडावी माजी जि प सदस्य, उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण संजय गणवीर, बाल प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी,शामराव बिसेन,गायत्री केळवतकर,स्वर्ण माला साखरे ,सत्य शिला ठाकरे, निखीता धुर्वे, अनिल बोपचे,शिदार्थ काबंळे,भरत गुरव, कनकलता काळे एस डी बोबडे,व सर्व आगंनवाडी सेविका उपस्थित होते. सभापती संजय टेभंरे पुढे म्हणाले किआंगनवाडी डिजिटल करून बोलक्या झाले पाहिजे.
सर्व सुविधा निर्माण तयार करून नवीन इमारती बांधल्या जातील व सेविका यांनी मुलांना चांगले शिक्षण देण्याची गरज आहे असे बोलले. उपसभापती हुपराज जमईवार यांनी ही पोषण आहार चांगले सुरक्षित स्थळी ठेवून खराब होऊ नये यासाठी काळजी व विद्यार्थी ना काँनव्हेट च्या धरती वर शिक्षण देण्यात यावे व दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यावर बोलके होऊन अभ्यासक्रम समजले पाहिजे याची दखल घेतली पाहिजे असे मार्गदर्शन केले. प्रस्ताविक विनोद चौधरी व संचालन नंदा कावळे आभार दिपाली नवखडे यांनी मानंले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिटि इंगले,सर्व सेविका यांनी सहकार्य केले.