10 झोपडपट्टयातील जवळपास 2000 झोपडीधारकांना थेट मालकी पत्रक मिळणार-मनपा स्तरीय समितीचा निर्णय

नागपुर :- बुधवार दिनांक 09/08/2023 रोजी मा.जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अध्यक्षतेत नागपूर शहरातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटपा संदर्भात आढावा सभा घेण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेव्दारे अतिक्रमित झोपडपट्टयांचे सर्व्हेक्षण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेल्या शासनाच्या मालकीच्या जागेवरील बिनाकी, बोरगांव, हंसापूरी, वाठोडा, कुराडपूरा, पुणापूर, काचीमेट, खामला, चिंचभुवन व परसोडी या 10 झोपडपट्टया हया आबादी क्षेत्रावर वसलेल्या असल्याने तेथील झोपडीधारकांना मालकी पट्टे न देता नगर भुमापन (सिटी सर्व्हे) विभागाव्दारे थेट मालकी पत्रक (property card) संबंधीत झोपडीधारकांना दिल्या जावू शकते असा निर्णय मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत गठीत असलेल्या समितीने घेतलेला आहे. यामुळे या झोपडपट्टयातील जवळपास 2000 झोपडीधारकांना याचा लाभ होणार आहे. तसेच अजनी चुनाभट्टी ही पूर्णत: झुडपी जंगल च्या जागेवर वसलेली आहे किंवा कसे हयाबाबत जूने अभिलेख बघून खातरजमा करुन घेण्याबाबत संबंधीत विभागास निर्देश सुध्दा देण्यात आले.

तसेच नागपूर महानगरपालिकेव्दारे, महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील रामबाग, शिवाजीनगर,भुतेश्वर नगर, नवीन फुटाळा, शोभाखेत, चिमाबाईपेठ, कुंभारटोली, बौध्दपूरा-महारपूरा, सरस्वती नगर, गुजर या झोपडपट्टयांतर्गत ज्या झोपडीधारकांनी अजून पर्यंत त्यांना मालकी पट्टे मिळण्याबाबत महानगरपालिकेकडे आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत, अश्या झोपडीधारकांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करुन घेण्याकरीता मा.आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी शिबीराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते, त्याअनुषंगाने मिलिंद मेश्राम, उपायुक्त(महसूल) तथा नियंत्रण अधिकारी, झोपडपट्टी पट्टा वाटप कक्ष, मनपा यांचे मार्गदर्शनात दिनांक 07/08/2023 पासून संबंधीत झोपडपट्टी क्षेत्रात शिबीराचे आयोजन सुरु केले आहे. वरील नमूद अतिक्रमित झोपडपट्टीतील नागरीकांनी आपले क्षेत्रातील खालील प्रमाणे शिबाराची तारीख जाणून घेवून शिबीरात नियुक्त अधिकारी व एजन्सीच्या प्रतिनिधींकडे आपले कागदपत्रे जमा करुन मालकी पट्टे प्राप्त करुन घेण्याबाबतची प्रकिया पार पाडण्याकरीता श्री. विलास जुनघरे, उप अभियंता, मोबाईल क्र.9112776116 व श्री. प्रेमानंद मोटघरे, स्थापत्य अभि.सहायक मोबाईल क्र.9422473691 यांचेशी संपर्क करुन आयोजित शिबीराचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन मिलिंद मेश्राम, उपायुक्त(महसूल) तथा नियंत्रण अधिकारी, झोपडपट्टी पट्टा वाटप कक्ष, महानरपालिका, नागपूर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टैक्सी चालकों की समस्या एक महीने में दूर करने की आरटीओ की ओला उबर ओवी के प्रतिनिधियों को चेतावनी

Wed Aug 9 , 2023
– एग्रीगेटर लायसंस के नियमों का उल्लंघन करने पर लायसंस रद्द किया जाएगा- प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते नागपूर :-ओला उबर टैक्सी चालकों का एप बेस्ड एग्रीगेटर कंपनीयों द्वारा किये जा रहे शोषण के खिलाफ विदर्भ एप बेस्ड वर्कर्स युनियन ने शिकायत करने पर प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते ने शिकायत पर संज्ञान लेकर 1 अगस्त को सिविल लाइन्स के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com