त्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील – नवाब मलिक

मुंबई दि. २८ जानेवारी -भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा आज निकाल आला असून त्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

१२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा सरकारचा निर्णय नाही हा विधीमंडळाचा निर्णय होता. विधीमंडळाचे अधिकार व न्यायालयाचा आदेश याबाबत जो काही अभ्यास करायचा असेल तो विधीमंडळ सचिवालय करेल आणि अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्वातंत्र्य संग्राम सैनिक यादवराव देवगडे यांच्या घरापुढे मनपाद्वारे नामफलक प्रदर्शित

Fri Jan 28 , 2022
नागपूर, ता. २८ : नागपूर महानगरपालिकेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंतीच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताकदिनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक यादवराव देवगडे यांचा घरासमोर नाव फलक लावण्यात आले. यावेळी नगरसेवक अमर बागडे, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, रघुबीर देवगडे, आकाश पांडे, गणेश अजमीरे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपातर्फे हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!