नवरात्री रास गरबा महोत्सव २०२४ कन्हान येथे जोमात रंगत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– माहेर महिला मंच कन्हान, कांद्री, टेकाडी व्दारे रास गरबा महोत्सवाचे आयोजन

कन्हान :- माहेर महिला मंच कन्हान, कांद्री, टेकाडी व्दारे नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरिल कुलदीप मंगल कार्यालय मैदान कन्हान येथे आदी शक्ती, कुलस्वामिनी दुर्गा मातेचे नवरात्र महिला शक्ती प्रेरित या महोत्सवात मातेच्या नामस्मरणात रास गरबा खेळत, जयघोष करित, भक्तीत रसात तल्लीन हो़ऊन आंनदोत्सव कन्हान येथे रास गरबा महोत्सव २०२४ अतिशय जोमाने चांगलाच रंगत आणुन परिसरातील भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

गुरूवार (दि.३) ऑक्टोंबर ला रात्री ८ वाजता माहेर महिला मंच कन्हान,कांद्री,टेकाडी व्दारे कुलदीप मंगल कार्यालय मैदान जे.एन. रोड कन्हान येथे नवरा त्री उत्सव थाटात साजरा करण्यास रास गरबा महोत्स व २०२४ आदीशक्ती, कुलस्वामिनी दुर्गा मातेची विधी वत पुजा अर्चना आयोजक नरेश बर्वे व सौ रिता बर्वे हयानी जोडप्यानी करून प्रतिमे सामोर घट स्थापना करून रामटेक चे खासदार श्यामकुमार बर्वे, रश्मी बर्वे, शिवसेना माजी खासदार प्रकाश जाधव, कॉग्रेस नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मु़ळक यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करित मातेची आरती करून रास गरबा महोत्सवाची थाटात सुरुवात करण्यात आली.

घर आणि मुलाबाळांच्या सांभाळ कऱणा-या महिलांना स्वतंत्र पणे सामाजिक जिवनात मुलांंबाळांसह नारी शक्ती प्रेरित नवरात्रीचा आंनदोत्सव साजरा करता यावा. महिलांना हक्काचे मंच मिळावे या सार्थ उद्देशाने रास गरबा महोत्सवाचे आयोजन करून मागील पंधरा दिवसा पासुन रास गरबाची तालिम घेत छोटया मुली, महिला व १५ वर्षाचे आत मुले असे ३०० च्यावर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. नव दिवस रास गरबा खेळणा-या उत्कुष्ट स्पर्धक तसेच सहभागी विविध पैलु च्या स्पर्धकांना मंच व्दारे बक्षीस देऊन गौरव करून प्रोत्साहित करण्यात येणार आहे. रास गरबा महोत्सव २०२४ च्या यशस्वितेकरिता माहेर महिला मंच संचालि का, अध्यक्षा- सौ रिता नरेश बर्वे, कन्हान उपाध्यक्षा- वैशाली सुरेश बेलनकर, सचिव- सुनिता चिंधुजी मान कर, कांद्री अध्यक्षा- दिप्ती रविंद्र समरित, उपाध्यक्षा- नम्रता विलास बावनकुळे, सचिव- प्रीती राजेश दिक्षीत, टेकाडी अध्यक्षा- आशा अनिल मोहोड, उपाध्यक्षा- करूणा टोलुराम भोवते, सचिव- सुनिता चंद्रमणी भेला वे, व्यवस्थापन समिती- गुंफा तिडके, रेखा टोहणे, स्वाती मस्के, मोना बर्वे, सिमा मनघटे, उत्सव समिती- चेतना भोवते, अश्विनी गाढवे, वर्षा सातपुते, प्रणाली रंगारी, छाया रंग, पारितोषिक समिती- दर्शना तिडके, रजनी कवडे, सुमन भिवगडे, मनिषा खानकुरे, मनिषा बर्वे, पुजा समिती- भारती बर्वे, शैला राऊत, सुनिता पांडे, माधुरी फुकटकर, शालु गजबे, आरती राऊत, स्वागत समिती- संगिता वांढरे, ज्योती आंबिलढुके, कंचन म्हस्के, रंजना देशभ्रतार, सारिका खोब्रागडे, मंदा बागडे, मिना वाटकर, अतिथी नियोजन समिती- मिना ठाकुर, मंजु जंम्बे, संध्या सिंग, भुमिका बोरकर, पुष्पा कावडकर, कल्पना नितनवरे, श्वेता थटेरे, कोमल वांढेकर, इंद्रकला गिरडकर, चंपा दारोडे, निर्णायक समिती- आशा खंडेलवाल, चारू चौकसे, नितु तिवारी, राधिका झेंडे आदी सह समस्थ महिला सदस्य परिश्रम करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डबलडेकर उड्डाणपूल नागपूरसाठी ठरणार वरदान - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

Sun Oct 6 , 2024
– एलआयसी-ऑटोमोटिव्ह चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण नागपूर :- नागपूरमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झालेला आहे. हे शहर हळूहळू बदलत आहे. त्यात आता एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौक या डबलडेकर उड्डाणपुलाची भर पडली आहे. हा उड्डाणपूल नागपूरकरांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले. तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!