पारशिवनी :- तालुकातिल नवेगाव खैरी, येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे राष्ट्रीय हरित सेना व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारशिवनी (सामाजिक वनीकरण) यांचे संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह अंतर्गत राज्यस्तरीय निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात इयत्ता ८ ते १० वीच्या गटातील निबंध स्पर्धेत दिपाली वारकर (प्रथम), युवराज चक्रवर्ती (द्वितीय) आणि अंजली दिवटे (तृतीय), चित्रकला स्पर्धेत नीलम सराटे (प्रथम), कुश ढोरे (द्वितीय), माही डायरी (तृतीय),इयत्ता ५ ते ७ वीच्या गटातील निबंध स्पर्धेत सेजल कळमकर (प्रथम), भुवनेश्वर शेंडे (द्वितीय), वंशिका सावरकर (तृतीय), चित्रकला स्पर्धेत हर्षल कुंभरे (प्रथम), नाहिद परवीन खान (द्वितीय), सेजल कळमकर (तृतीय) या विजेत्यांसह सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सोनीराम धोटे, ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर, नीलकंठ पचारे, सतीश जुननकर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व शैक्षणिक साहित्य स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक साक्षोधन कडबे यांनी केले.
याप्रसंगी दिलीप पवार, चंद्रशेखर भोयर, शैलेंद्र देशमुख,तारा दलाल, अमित मेश्राम, अर्चना येरखेडे व शिक्षकेत्तर कर्मचारी मानसिंग कोवाचे, लिलाधर तांदूळकर, मोरेश्वर दुनेदार, रशीद शेख, गोविंदा कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.