कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील जागृत गर्देश्वरी मंदिरात नवदुर्गा उत्सवाला 3 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे. गुरुवारला सकाळी आठ वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर आरती करून भजनाच्या कार्यक्रम करण्यात आला. 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत भजन संमेलन, भजन ,लहान मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम ,गरबा व दांडिया इत्यादी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे . 11 ऑक्टोबर शुक्रवार ला सकाळी नऊ वाजता हवन ,मुक्तापूर येथील गोपीचंदजी माकोडे महाराज यांचे पूजन काल्याचे किर्तन. सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद .शनिवार 12 ऑक्टोबर ला सकाळी नऊ वाजता घट विसर्जन व शोभायात्रेने समारोप करण्यात येणार आहे .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गर्देश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष एकनाथ मसराम ,उपाध्यक्ष भुमय्या दबेटवार ,सचिव गोपाल हटवार, सहसचिव सुभाष गिरमेकर, सदस्यगण नरेश बावनकुळे, नेमीचंद चौकसे, सुनील शिवणकर ,अनिल बावनकुळे, शरीफ पठाण, उमेश कोठुरुंगे, पोलीस पाटील प्रकाश देवतळे, अशोक घोलपे ,अरुण घोलपे, भगवान बावनकुळे ,पुजारी माणिकचंद मोहने ,अशोक ठाकरे,डोमा ठोंबरे ,चंद्रभान काजणे परिश्रम घेत आहे.
हे एक जागरूक तीर्थस्थळ असून या तीर्थस्थळाला शासनाकडून करोडो रुपयांच्या निधी प्राप्त होत आहे. नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या विशेष प्रयत्नाने या तीर्थस्थळाला 2 करोड 49 लाखाच्या निधी मंजूर झाल्याचे मंडळाचे सचिव गोपाल हटवार यांनी सांगितले असून हे मंदिर भव्य दिव्य होणार असून परिसरातील तालुक्यातील, जिल्ह्यातील ,राज्यातील व देशातील नागरिक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.