निसर्गोपचार चिकित्सा पद्धती भारताला मिळालेले वरदान – डॉ.टाकु

विद्यापीठात राष्ट्रीय दिनानिमित्त एकदिवसीय अतिथी व्याख्यान संपन्न

अमरावती :- आजच्या धकाधकीच्या तसेच ताणतणाव जीवनशैलीमुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. आज प्रत्येक घरांमध्ये विविध प्रकारच्या व्याधींनी त्रस्त व्यक्ती पहावयास मिळतात. अशा व्याधींवर मात करण्याकरिता निसर्गोपचार चिकित्सा पद्धती भारताला मिळालेले एक वरदान असून त्यामुळे कोणताही त्रास त्वरीत कमी होत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद दिल्ली येथील जनरल सेक्रेटरी डॉ. प्रदीप टाकु यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत पदव्युत्तर पदवीका निसर्गोपचार व योगशास्त्र अभ्यासक्रमाच्यावतीने राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्य एक दिवसीय अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील एस्ट्रो एक्युप्रेशर केंद्राचे संचालक डॉ. विकास पांडे उपस्थित होते.

निसर्गोपचार व योगशास्त्र विषयाचे महत्व पटवून देतांना डॉ. प्रदिप टाकु म्हणाले, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वाद्वारे मनुष्य शरीर बनलेले असून पंचतत्व आपल्या शरीरात सामावलेले आहे. यातील एकही तत्त्वाची कमी ही शरीरात रोग उत्पन्न करते, म्हणून यांचे तारतम्य आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे. सध्या इंग्रजी औषधांच्या अतिवापरामुळे मनुष्य शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागले असून त्यावर योग्य उपचार म्हणजे निसर्गोपचार आहे. तसेच “चुटकी मे दर्द भगाओ” या उक्तीद्वारे उपस्थितांमधील काहींच्या दुखण्यावर इलाज करून या उपचार पद्धतीची उपयोगिता प्रात्यक्षिकांद्वारे डॉ. टाकु यांनी सांगितली. वैकल्पिक चिकित्सा पद्धतीमध्ये विशिष्ट मर्म बिंदूंवर योग्य प्रमाणात दाब दिल्यास विविध आजारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे सांगून निसर्गोपचार पध्दती ही मानवनिर्मित समाजाकरीता एक संजीवनी ठरत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.

प्रमुख अतिथी डॉ. विकास पांडे यांनी ‘आकृती विज्ञान’ द्वारा विशिष्ट पदार्थांच्या अतिसेवनाने होणारे दुष्परिणाम हे समोरील व्यक्तींच्या चेह­यावरून आपण कसे ओळखू शकतो ? तसेच रुग्णाच्या शारीरिक व्यक्तिमत्त्वाचे योग्य निरीक्षण केल्यास त्याच्या चेह­यावरून अथवा हालचालींवरून त्याला होणारा त्रास अथवा विकारांचे निदान कसे लावता येईल ?, हे याप्रसंगी पटवून दिले. त्यांनी उपस्थितांमध्ये बसलेल्या काही व्यक्तींच्या चेह­यावरून आणि बैठकीवरून त्याला होणार त्रास व त्याचबरोबर त्यावर उपाययोजना सुद्धा सुचवली.

अध्यक्षीय भाषणातून संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी विभागामध्ये चालवण्यात येणा­या विविध उपक्रमांची माहिती देऊन विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच प्रवेशित विद्याथ्र्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे हा अभ्यासक्रमाच्या मागचा हेतू नसून विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले. निसर्गोपचार व योगपध्दती मानव विकासाकरीता आरोग्यवर्धक संकल्पना असून प्रत्येक कुटुबींयानी आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्याकरीता या पध्दतींचा अवलंब करावा, जेणे करुन जीवन सुखकर व आनंदी जगण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी सन्मानचिन्ह व रोपटे देऊन अतिथींचे स्वागत केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. अश्विनी राऊत, सूत्रसंचालन प्रा. अदित्य पुंड, तर आभार प्रा. राहुल दोडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. संदीप महल्ले, प्रा. अनाघा देशमुख, प्रा. राधिका खडके, यांनी विशेष परीश्रम घेतलेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

Sat Nov 26 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- जिल्हातील तिरोडा तालुक्यात दिनांक 26/11/2022 ते 6/12/2022 हा कालावधी समता पर्व म्हणून विविध उपक्रम राबवून संविधानाची जागृती घडविण्यासाठी साजरा करावयाचा आहे. या अनुषंगानेच आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी ता तिरोडा जि गोंदिया येथे संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करून समता पर्वाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com