चंद्रपूर । भारत निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली. हा दिवस संपूर्ण देशभरात ”राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवा म्हणून जनजागृतीसाठी केली जात आहे. यादृष्टीने चंद्रपूर शहर महापालिकेतर्फे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बाबुपेठ येथील अमर चौक, समाधी वॉर्ड येथील महादेव मंदिर परिसर, पठाणपुरा आणि बाबूपेठ मराठा चौक येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत मताधिकार आणि लोकशाही या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्या संबंधित शपथ घेण्यात आली. बाबूपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत विद्यार्थींनीनी सहभाग घेतला होता. महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यात बाबुपेठ येथे प्रथम क्रमांक संजना रचावार, द्वितीय रजता येवले, तृतीय मनीषा आंबटकर, समाधी वॉर्ड येथे प्रथम साक्षी लोहकरे, द्वितीय हिमांगी विश्वास, पठाणपुरा येथील स्पर्धेत प्रथम प्रणाली साठोणे, द्वितीय जान्हवी शेंडे, तृतीय श्रेया खनणॆ याना बक्षीस देण्यात आले.