अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- ज्या प्रमाणे स्वच्छता हाआरोग्यावर प्रभाव पडणारा अंत्यत महत्त्वाचा घटक आहे. त्याच प्रमाणे पोषण आहार हा लहान बालक व माता, कशोरीमुली,कुपोषित मुलेयासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असुन पोषण आहार ही लोकचळवळ होणें आवश्यक आहे असे प्रतिपादन उपसभापती हुपराज जमईवार यांनी केले. पुढे म्हणाले केंद्र व राज्य सरकारने बालकांच्या पोषण आहार विषयक दर्जा सुधारणा बाल मुत्यु, कुपोषण प्रमाण कमी करण्यासाठी सन १९७५.७६पासून टप्पा टप्पा राबविण्यात येत आहे. यात पुरक पोषण आहार ६ महीने ते ६ वर्ष वयोगटातील मुले गरोदर माता,स्तनदा माता यात तीव्र वजनाच्या लाभार्थी ना घरपोच आहार व किशोरवयीन मुलीच्या सक्षमीकरण साठी व सेवा पंधरवडा दि १७ ते २आँक्टोबर पर्यंत राबविण्यात येत आहे. गोंमोहाळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित राष्ट्रीय पोषण आहार अभियान कार्यक्रम चे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य चतुर भुज बिसेन यांच्या हस्ते .करण्यात आले. उपसभापती हुपराज जमईवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ चैतलाल भगत पंचायत समिती सदस्य, बाल प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, सरपंच दुर्गा शरनागत, उपंसरपंच भाष्कर येळे,माजी संरपच ग्रामपंचायत सदस्य जागेश्वर निमजे,भुमेश्वर शेन्डे, ग्राम विकास अधिकारी संजय मुळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आंगनवाडी सेविका, मदतनीस, माता बगीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षिका बोबडे यांनी केले.संचालन प्रमिला आंबेडारे आभार बिरजुला तिडके, यांनी मांनले .कार्यक्रम यशस्वीसाठी मंदा खोब्रागडे, योगीता बोपचे,धनुकला नागपुरे,वनिता शेन्डे यांनी विशेष सहकार्य केले.