अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- तिरोडा तालुक्यातील कोडेलवारा येथे महिला बाल विकास प्रकल्प अतंर्गत आंगनवाडी च्या विघमाने राष्ट्रीय पोषण आहार अभियान राबविण्यात आले .या अभियानाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य सौ तुमेश्वरी बघेले यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समिती सदस्य दिपाली टेंभेकंर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य तेजराम चौव्हान, संरपच निर्मला गौतम, उपंसरपच जितेंद्र टेभेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण संजय गणवीर, बाल प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी,जिल्हा समन्वयक साजन,विस्तार अधिकारी जाधव,मुख्याध्यापक बघेले , अध्यक्ष व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पर्यवेक्षिका नवतळे व गावातील नागरिक ,माता भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरी बघेले यांनी मातांना, व लहान बालक,किशोरवयीन मुली,कुपोषित मुले याना पोषण आहार ची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. कुणी बालक आहार पासून वचिंत राहु नये. बालकांना चांगले दर्जेदार शिक्षण हि देण्यात यावे आपला बालक हा आंगनवाडी बोलका झाला पाहिजे. कुणी ही बालक बाहेर च्या खाजगी काँन्वेट मध्ये जाऊ याची ही दखल घेतली पाहिजे .सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याचा विचार पालक नेही करण्याची गरज आहे. असे मार्गदर्शन उपस्थित मातांना व आंगनवाडी सेविका, नागरिकांना केले. तेजराम चौव्हान, दिपाली टेभेकर, संजय गनविर,विनोद चौधरी यांनी ही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन बिट्टी इंगले यांनी केले व आभार रशिका गौतम राऊत यांनी मानले.