नई दिल्ली – २०२० मध्ये एक्सप्रेसवेसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुरुवारी संसदेत देण्यात आली. लोकसभेत लेखी उत्तर देताना, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला.
गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर इत्यादींचा समावेश होतो.