मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी स्वीकारला पुरस्कार
नागपूर : कोरोना महामारीच्या दरम्यान कोव्हिड बेडच्या संदर्भात अध्याभूत माहिती देणारे ‘कोव्हिड बेड’ अँप्लिकेशन तयार करून नागरिकांच्या सेवेत रुजू केल्याबद्दल स्मार्ट सिटीस कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे आयोजित कार्यक्रमात मुंबई येथे नागपूर स्मार्ट सिटीला राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार देण्यात आले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी स्मार्ट सिटीच्या वतीने पुरस्कार स्वीकारले.
स्मार्ट सिटीस कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे स्मार्ट अर्बनेशन (urbanation) कार्यक्रम २६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारतर्फे करण्यात आले होते. देशातील वेगवेळ्या स्मार्ट सिटींना स्मार्ट प्रोजेक्ट अवॉर्ड त्यांच्यातर्फे करण्यात आलेले अभिनव कामासाठी देण्यात आले. देशातील ३३ शहरांनी यासाठी नामांकन केले होते. यामधून नागपूर स्मार्ट सिटीला कोरोना महामारी दरम्यान केलेल्या कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात रि-थिंकींग स्मार्ट मोबॅलिटी – दि न्यू मोबॅलिटी लँडस्कॅप (REthinking Smart Mobility – The new Mobility Landscape) विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चिन्मय गोतमारे यांनी चर्चासत्रा दरम्यान आपले विचार मांडले. याला सर्व प्रतिनिधींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
नागपूर स्मार्ट सिटीद्वारे कोव्हिड महामारी दरम्यान तयार केलेले ॲप्लिकेशनचा नागरिकांना फायदा झाला. जेव्हा नागरिकांना बेड्स मिळत नव्हते तेव्हा स्मार्ट सिटीच्या कोव्हिड बेड ॲप्लिकेशनचा वापर करून नागपूरकरांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात बेड्सची माहिती सहज उपलब्ध झाली. या ॲप्लिकेशनद्वारे डॅशबोर्ड, अद्ययावत खाटांची संख्या, ऑक्सिजन, आय.सी.यू. आणि व्हेंटिलेटरची माहिती मिळण्यास मदत झाली.
स्मार्ट सिटी आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे निदान, विलगीकरण, चाचणी आणि उपचारावर भर देण्यात आला होता. याचा मुख्य उद्देश नागरिकांच्या जीवनाचे रक्षण करणे होते आणि त्याला यश सुद्धा मिळाले. नागपुरात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात वॉररूम स्थापन करण्यात आले होते. चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, कोव्हिड महामारीमध्ये नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्याला महत्व देण्यात आले होते. स्मार्ट सिटीतर्फे तयार करण्यात आलेल्या ॲप्लिकेशनचा नागरिकांना फार लाभ झाला. त्यांनी ई-गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले, प्रोग्रॅमर अनूप लाहोटी यांचे ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी अभिनंदन केले. मुख्य नियोजक राहुल पांडे, प्रोजेक्ट एक्सुकेटिव्ह डॉ. पराग अरमल यांनी कार्यक्रमात नागपूर स्मार्ट सिटीच्या स्टॉलसाठी परिश्रम घेतले.