संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-भोई समाज युवा क्रांतीदल संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे यांच्या मार्गदर्शनात प्रदेश अध्यक्ष अर्जुन मोरे यांनी कामठी येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नंदू कोल्हे यांची भोई समाज युवा क्रांती दल च्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे,प्रदेश महासचिव अर्जुन भोई,प्रदेश अध्यक्ष अर्जुन मोरे,प्रभारी प्रदेश अध्यक्ष राहुल हरसूले , कार्याध्यक्ष सुखदेव मेश्राम,महिला अध्येक्षा अल्का घटे, उपाध्यक्ष लीलाधर खोडके अमोल बावणे यांचे आभार मानले. तसेच भोई समाज चळवळ योग्य दिशेने वाटचाल करावी म्हणून मागील अनेक वर्षात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.समाज संघटन ,आरक्षण, एकत्रीकरण, यामध्ये सकारात्मक विचार करून नियुक्ती केली असल्याचे मनोगत प्रकाश लोणारे यांनी व्यक्त केले.
प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.