नांदगाव ते राजोली रस्त्याची हालत खस्ता, वाहानधारक त्रस्त

कोदामेंढी :- मौदा हे तालुक्याचे ठीकाण असून,कोदामेंढी, नांदगाव व परिसरातील नागरिक, शासकीय व नीमशासकीय कर्मचारी त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनाने मौदा येथील तहसील कार्यालय व पंचायत सामिती कार्यालयात जाण्यासाठी नांदगाव ते राजोली या मार्गाचा अवलंब करतात.तर कोदामेंढी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन कान्वेंट, तीन टू व्हीलर शोरूम व मोठी बाजारपेठ असल्याने राजोली व परिसारातील नागरिक राजोली ते नांदगाव या मार्गाचा अवलंब करतात. परंतु मागील एक वर्षापूर्वीपासून या मार्गाची अत्यंत दुरावस्ता झालेली आहे. या अंदाजे 2 किमी रस्त्यावर 200 ठिकाणी खड्डे पडले आहेत, खड़डयांच्या भोवताल गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या रस्त्यावर जान्यायेण्याचा अनुभव घेतलेले कोदामेंढी ग्रामपंचायत उपसरपंच गोपाल गिरमेकर, सदस्या अनीता हटवार सह कोदामेंढी,नांदगाव,राजोली व परिसरातील त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिलेल्या सेवेच्या कर्तव्यपूर्तीचा मोठा आनंद असतो - कुलसचिव डॉ. तुषार देशमुख

Sun Apr 30 , 2023
– कर्तव्यपूर्ती सोहळ्यात विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान अमरावती :- सेवानिवृत्त होत असतांना कर्मचा-यांनी दिलेल्या सेवेच्या कर्तव्यपूर्तीचा त्यांना मोठा आनंद असतो व विद्यापीठालाही त्यांचा अभिमान आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले. शनिवारी दि. 29 एप्रिल, 2023 रोजी विद्यापीठातील वित्त विभागातील कर्मचारी आर.डी. हटवार व आय.क्यू.ए.सी. विभागातील आर.डी. कोकाटे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com