संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात आयोजित नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा दिनांक २१ – २ – २०२४ रोजी अंतिम सामना खेळण्यात आला. अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात जगदंबा वॉरियर्स कोराडी संघ विजेतेपद तर आली गृप कामठी संघ उप विजेतेपद मिळवण्यास यशस्वी ठरला . स्पर्धेत एकूण ७८ संघांनी सहभाग घेतला व क्रिकेट प्रेमींचा सुद्धा या चषकाला उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला . अंतिम सामन्यात विजेतेपद व उपविजेतेपद पटकावणाऱ्या संघांचा सत्कार कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला व विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख व नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप थाटात !
कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात आयोजित नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा दिनांक २१ – २ – २०२४ रोजी अंतिम सामना खेळण्यात आला. अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात जगदंबा वॉरियर्स कोराडी संघ विजेतेपद तर आली गृप कामठी संघ उप विजेतेपद मिळवण्यास यशस्वी ठरला. स्पर्धेत एकूण ७८ संघांनी सहभाग घेतला व क्रिकेट प्रेमींचा सुद्धा या चषकाला उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला. अंतिम सामन्यात विजेतेपद व उपविजेतेपद पटकावणाऱ्या संघांचा सत्कार कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला व विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख व पारितोषिक देऊन व उपविजेत्या संघाला ३१ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन पुरस्कारीत करण्यात आले.
त्या प्रसंगी विेवेक मंगतानी, राजेश दुबे, अजय कदम, संजय कनोजीया, चेतन खडसे, उमेश रडके, किरण राउत, प्रिती कुल्लरकर, अनिकेत वानखेडे, निखिल येळणे, प्रमोद वर्णम, संगिता अग्रवाल, गायत्री यादव, प्रभा राउत,रमेश वैद्य, मंगेश यादव, कमल यादव,गोपाल सिरीया, अशफाकजी कुरेशी उपस्थित होते . व या भव्य नियोजनाचे दायित्व स्पर्धा नियोजन समिती कडे होते ज्यात सुनिल खाणवाणी, राज हडोती, प्रमेंद्र यादव, चंदन वर्णम, मुकेश शर्मा, संदिप कनोजीया, राकेश यादव, कामरान जाफरी, आकाश कनोजीया, कुणाल गड्डमवार, गजानन तिरपुडे, बंटी पिल्ले. यांचा समावेश आहे .