नागपूर :- महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात जिल्हा अॅमॅच्युअर बॉक्सिंग असो. ऑफ नागपूरतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील बॉक्सरने दमदार कामगिरी करीत पदके प्राप्त केली. या कामगिरीबद्दल नागपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने या यशप्राप्त खेळाडूंचा सत्कार मानकापुरातील क्रीडा संकुलात नुकताच करण्यात आला.
स्पर्धेत सबज्युनिअर मुलींच्या गटात नव्यानवेली स्वामीयारने सुवर्ण, झुबिया खान, श्रद्धा नंदनवरने व समिक्षा सिंगने कांस्यपदक, मुलांच्या गटात मल्हार साबळे व अनंत देशमुखने सुवर्णपदक तर धैर्य कोठी, उन्मेश देशमुखने कांस्यपदक प्राप्त केले. ज्युनिअर मुलींच्या गटात श्रद्धा खोब्रागडे, नाहीद अंजूम, क्रिशिका महेशकर यांनी कांस्यपदक तर खुशी शेखने रौप्यपदक प्राप्त केले. स्पर्धेत उत्कृष्ट बॉक्सर म्हणून मल्हार साबळे, उत्कृष्ट आव्हानात्मक म्हणून समिक्षा सिंग व खुशी शेखला सन्मानित करण्यात आले. याच कामगिरीबद्दल या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फिया पठाण, प्रशिक्षक गणेश पुरोहित आदी उपस्थित होते.