– पुरुषांची अ. भा. नेटबॉल स्पर्धा
नागपूर :- बंगळुरु येथील कर्नाटका राज्य विधी विद्यापीठाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय पुरुषांच्या नेटबॉल स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाने सलग दोन विजय नोंदवित स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
बंगळुरु येथील सौंदर्या कॉलेज ऑफ लॉ येथे मंगळवारपासून सुरु झालेल्या स्पर्धेत नागपूर विद्यापीठाची सलामी लढत राणी चन्नमा विद्यापीठासोबत झाली. या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करीत नागपूर विद्यापीठाने ६३-२२ अशा म्हणजेच ४१ गुणांच्या फरकाने विजय नोंदवित स्पर्धेत विजयी सुरुवात केली होती.
नागपूर विद्यापीठाचा स्पर्धेतील दुसरा सामना बुधवारी उस्मानिया विद्यापीठासोबत झाला. या सामन्यातही पहिल्या सामन्यातील कामगिरी नागपूर विद्यापीठाच्या खेळाडूंनी कायम ठेवली. यात ५८-२७ म्हणजेच तब्बल ३१ गुणांच्या फरकाने नागपूर विद्यापीठाने विजय नोंदविला. या कामगिरीच्या जोरावर नागपूर विद्यापीठाने तिसऱ्या प्रवेश केला आहे.
नागपूर विद्यापीठ संघ- तोपेश सावरकर,अभय वाघाडे, हर्षद मांडिये(सर्व एनएमडी कॉलेज, गोंदिया), यश कापटे, तुषार ठांबरे(जीएस कॉमर्स वर्धा), ऋषिकेश कुबडे(यशवंत महा. वर्धा), मोहित पटेल(डीबीएम कॉलेज, गोंदिया), विक्की बोपचे(शंकरलाल अग्रवाल महा. सालेकसा), सुमित यादव(श्री चक्रधर कॉलेज), विकाल कुभांरे(सीजे पटेल कॉलेज तिरोडा), साहिल पंचबुद्धे(आर्टस कॉमर्स कॉलेज), देवमेश डोंगरवार (एमबी पटेल).
राखीव खेळाडू- संदीप पटले(शंकरलाल अग्रवाल कॉलेज), चेतन कुकडे(आर्ट्स कॉमर्स कॉलेज), प्रवीर बागडे(एनएमडी कॉलेज गोंदिया), दिगंबर बावणे(यशवंत महा. वर्धा).