– पाच आरोपी अटक, एकुण ५,८८,५०५ रुपयां चा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- नगरपरिषद जुनी इमारत च्या बाजुला मच्छी मार्केट येथील साई लाॅट्री दुकाना समोर सार्वज निक रोडवर सुरु असलेल्या जुगार अड्यावर नागपुर ग्रामिण विशेष पथकांने धाड मारुन पाच आरोपी ला अटक करुन त्याचा जवळुन एकुण ५,८८,५०५ रुपयां चा मुद्देमाल जप्त केला आहे .
सोमवार (दि.२७) मे ला सायंकाळी नागपुर ग्रामीण विशेष पथक कन्हान परिसरात अवैध धंधे रेड कामी पेट्रोलिंग करित असतांना माहिती मिळाली कि कन्हान मच्छी मार्केट मध्ये जयस्वाल दारू भट्टीचे मागे मोनु यादव हा आपले बंद पडलेल्या साई लॉट्री दुकाना समोर सार्वजनिक रोडवर काही इसम लोकांकडुन पैसे घेवुन कागदावर वर्ली मटक्याचे आकडे लिहुन तसेच ताश पत्त्यावर पैसे लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अशा माहितीवरून पोलीसांनी घटनास्थळी पोह चुन साई लॉट्री दुकानासमोर सार्वजनिक रोडवर जुगार अड्डयावर धाड मारली असता आरोपी १) रोहित उर्फ मोनु रामुजी यादव, २) अमोल देवमंन तिमांडे, ३) विवेक शांताराम खडसे तिघेही रा. कन्हान, ४) सुमित भिमराव कोटांगळे, ५) महेश गंगाधर ठवकर दोघेही रा. कामठी हे हारजितचा जुगार खेळ खेळतांनी मिळु न आल्याने पोलीसांनी आरोपींना अटक करुन ०६ वेगवेगळ्या कंपनीचे अँन्ड्राईड व किपॅड मोबाईल फोन , एक कॅल्क्युलेटर व ५२ तासपत्ते, ०७ वेगवेगळया कंपनीच्या मोटारसायकल, नगदी रुपये असा एकुण ५ , ८८ ,५०५ रुपयांचाचा मुद्देमाल जप्त केला. सरकार तर्फे फिर्यादी प्रणय बनाफर यांचे तक्रारी वरून पोस्टे कन्हान येथे पाच आरोपी विरूद्ध कलम १२, १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम ३४ भादंवि अन्व ये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .
कन्हान पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरा वर नगरपरिषदे बाजुला मच्छी मार्केट येथे जुगार सुरू असल्याने कन्हान पोलीस मुंग गिळुन गप्प तर नाही ना म्हणुन सदर कार्यवाही नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष ए.पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचा मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, पोहवा ललित उईके, पोना प्रणय बनाफर, पोलीस अंमलदार कार्तिक पुरी, बाला जी बारगुले सह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्विरित्या पार पाडली.