- नागपूर :- नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हातर्गत पोलीस स्टेशन मधील वाहतुक नियमन करणारे नियुक्त असलेले. अधिकारी / अमलदार व वाहतुक शाखा तर्फे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द निरंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येते. वाढत्या अपघाताचे प्रमाण विचारात घेता व त्याचे विश्लेषण करून रस्ते अपघातांना आळा घालण्याकरीता अपघातास कारणीभूत ठरणाच्या कारणांवर विशेषतः लक्ष देवून त्याव्दारे दि. ०१/७/२०२३ ते १५/७/२०२३ पर्यंत मोटार वाहन अधिनियम अंतर्गत वेगवेगळया मोहीमा आयोजित करून कारवाई करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यांमध्ये मुख्यतः अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वेगमर्यादे वाहन चालविणे, विना सिटबेल्टचा वापर करणे इत्यादी प्रकारच्या शिर्षकाखाली विशेष मोहीम राबवुन खालील प्रमाणे कार्यवाही करून दंड वसूल करण्यात आला आहे.
वरिल शिर्षकाखाली विशेष मोहीम राबवुन नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हातर्गत पोलीस स्टेशन व वाहतुक शाखा तर्फे करण्यात आलेल्या ४५४८ कारवाईमध्ये रू. २३,०२,३५०/- ऐवढा दंड आकारण्यात आला असून त्यामध्ये ३७५९ केसेस मध्ये रू. १३,७७,२५० दंड वसुल करण्यात आलेला आहे. उर्वरित ७८९ केसेसमध्ये रू. ९,२५,१००/- ऐवढा दंड वसुल करणे बाकी आहे. प्रलंबित चालान केसेस मध्ये दंड वसुली बाबत मोहीम सुरू आहे.. सदर विशेष मोहीम कारवाईमुळे दि. १/७/२०२३ ते १५/७/२०२३ पर्यंत घडलेल्या अपघाताची आकडेवारी पाहता अपघातांना आळा घालण्यास यश प्राप्त झाले आहे. अशाच प्रकारे दिनांक ३१/०७/२०२३ पर्यंत वरील शीर्षकाखाली विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत जिल्हा वाहतुक शाखा मधील रामटेक बिट, काटोल विट, सावनेर विट, उमरेड विट, बोरी बिट व कन्हान विट तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह संयुक्तिकरीत्या जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविदयालय येथे होणारी शालेय परिवहन वाहतुकवावत वापरण्यात येणारी स्कुल बस मार्गदर्शकतत्वा प्रमाणे सुनियमित वाहतुकीसंबंधाने स्कुल बसेसची पडताळणी / त्याचप्रमाणे वाहनाची सर्वकागदपत्रे पडताळणी संबंधाने विशेष मोहीम राबवुन ज्या स्कुल बसचे कागदपत्रे परिपूर्ण आढळून न आल्यास त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन सपोनी खोब्रागडे पोस्टे काटोल अधिकान्या मार्फत योग्य तो दंड आकारण्यात येवुन संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये वाहन डिटेन करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही व त्याचे फलीत यात प्रामुख्याने विशाल आनंद (भापोसे), पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले, अपर पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण, विजय माहुलकर, प्रभारी पोलीस उप अधीक्षक (गृह), नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी / कर्मचारी यांचे सहभागाने राबविण्यात येत आहे.