नागपूर महानगरपालिका नागपूर (प्रवर्तन विभाग)

नागपूर :- म.न.पा प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 04.02.2025 रोजी मंगळवारी झोन क्र १० आणि धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत पथक क्र.१,पथक क्र.२ आणि पथक क्र.५ यांनी मिळुन संयुक्तरीत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 01:00 वाजेपासून ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत कारवाई सुरू आहे.

कारवाई मध्ये झोन कार्यालय ते फ्रेन्डेस कॉलोनी ते गिट्टीखदान चौक ते काटोल रोड ते अवस्थी नगर चौक ते बोरगाव चौक ते गोरेवाडा चौक ते गोधनी रोड फरस ते मानकापूर चौक ते पागलखाना चौक ते सिव्हील लाईन पर्यंत अतिक्रमण निर्मूलन ची कारवाई करण्यात येत आहे ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अतिक्रमण धारकांची संख्या 30 वर सुद्धा अतिक्रमण पथकाद्वारा सुद्धा कारवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये आतापर्यंत 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि कारवाई सुरू आहे. 

•धंतोली झोन क्र ०४ आणि धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत पथक क्र.३ आणि पथक क्र ०४ यांनी संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 12:00 वाजेपासून ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत सुरू आहे अंतर्गत झोन कार्यालय ते काँग्रेस नगर चौक ते सिताबर्डी मेन रोड परिसर ते मोदी न 1. 2. 3 ते मानस चौक ते झासीराणी चौक ते मेहाडीया चौक ते यशवंत स्टेडीयम परिसर ते धंतोली चौक ते पंचशिल चौक ते लोकमत चौक ते रहाटे कॉलोनी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अनधिकृत बांधकामाची धारकांची संख्या अंदाजे 30 वर सुद्धा अतिक्रमण ची करवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये 02 ट्रक साहित्य सामान जप्त करण्यात आले आणि कारवाई सुरू आहे.

• ही कारवाई हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग यांचे मार्गदर्शनात भास्कर माळवे कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

माकडांच्या मलमूत्राचे घाणपाणी पितात पिपरावासी !

Wed Feb 5 , 2025
– टाकी बांधा अन्यथा आमरण उपोषण – सरपंच पाहुणे  बेला :- जवळच्या पिपरा येथील पाण्याची टाकी जुनी,जीर्ण व धोकादायक झाली आहे. त्या टाकीवर माकडांचा उच्छाद असतो. टाकीला झाकण नसल्यामुळे टाकीत माकडांचे मलमूत्र पडते.ते दूषित,घाणपाणी गेल्या अनेक वर्षापासून पिपरावासी पीत आहे. हि टाकी पाडून एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची नवीन टाकी बांधण्यात यावी. अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!