नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 98 टक्के मतदान

 

• शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण
• 12 केंद्रावर 100 टक्के मतदान
• एक मतदार आयोगाकडून अपात्र
• 560 पैकी 554 मतदारांचे मतदान
• 14 डिसेंबरला मतमोजणी
• बचत भवनात स्ट्राँग रूम

नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 560मतदार होते. त्यापैकी 554 (98.92 टक्के) मतदारांनी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान केले. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. 14 डिसेंबरला बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज मतदान प्रक्रीया पूर्ण झाल्यावर मतदान शांततेत पूर्ण झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. रात्री उशिरापर्यंत बचत भवनातील स्ट्राँग रूम मध्ये मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी पुढील चार दिवस तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. 14 डिसेंबरला सकाळी वाजता पासून 4 टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल येणे अपेक्षित आहे.
या निवडणुकीत नागपूर येथील शहर तहसिल कार्यालय, नागपूर ग्रामीण तहसिल कार्यालय, कामठी या तीन ठिकाणांना वगळता नागपूर शहरातील अन्य एक केंद्र, नरखेड, काटोल, सावनेर, रामटेक, कळमेश्वर, उमरेड, कन्हान, मौदा, बुटीबोरी, पारशिवणी,वानाडोंगरी येथील सर्व केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.एकूण 560 मतदारांपैकी एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. तर आज 5 मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे एकूण 554 मतदान झाले. मतदानाची एकूण टक्केवारी 98.92 आहे.
सकाळी 10 पर्यंत केवळ 2.5 टक्के मतदान झाले. दुपारी 12 पर्यंत ही टक्केवारी 25वर गेली. दुपारी 12 ते 2 ही टक्केवारी 89.10 टक्के तर शेवटच्या टप्यात ही टक्केवारी 98.92 झाली. ग्रामीण भागातही सकाळी केवळ काही ठिकाणी मतदान झाले. बहुतेक मतदान दुपारी झाले. शहर व ग्रामीण भागात या निवडणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना या कालावधीत घडलेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य या निवडणुकीत मतदार होते. सर्व 15 मतदार केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मतदारांनी देखील हातमोजे, घालून मास्क लावून व थर्मल स्कॅनिंग करीत आपला मताधिकार बजावला. आवश्यकता असणाऱ्या काही केंद्रांवर व्हीलचेअर देखील उपलब्ध करण्यात आली होती.
दिनेश दमाहे

9370868686

dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Isuzu Motors India to roll-out ‘ISUZU I-Care Winter Service Camp’ across India.

Fri Dec 10 , 2021
– Customers can avail the exciting service benefits* at all ISUZU authorised dealer service outlets from 13th to 24th December, 2021 Chennai – December, 2021: In a constant endeavour to reaffirm ISUZU’s commitment to provide best service and ownership experience, Isuzu Motors India will be conducting a nation-wide ‘ISUZU I-Care Winter Service Camp’ for its range of ISUZU D-MAX Pick-ups […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com