नासुप्र/नामप्रविप्रा येथे सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना घरोघरी तिरंगा या अभियानात तिरंगा ध्वज वितरण
नागपूर : सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत” “स्वराज्य महोत्सव” सोहळा साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून घरोघरी तिरंगा हे अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २0२२ या कालावधीत राबविण्यात येत असून, नासुप्रचे सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) यांच्याहस्ते आज शुक्रवार, दिनांक, १२ ऑगस्ट रोजी कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वितरण करण्यात आलेले असून अधिकारी / कर्मचाऱ्यांना वितरित केलेले झेंडे सर्व कर्मचाऱ्यांतर्फे घरी, कार्यालयात लावण्यात येणार आहे..तरी या अभियानात प्रत्येक नागरिकाने घरोघरी तिरंगा हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही यावेळी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी नागरिकांना केले.
तसेच सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी भारताचा राष्ट्रध्वज उंचावून भारतमातेचा जयजयकार केले. मंगळवार , दिनांक 09 ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम नासुप्र/नामप्रविप्रा कार्यालयात राबविण्यात येणार आहे.
यावेळी ‘नामप्राविप्र’चे नगर रचना विभागाचे सह संचालक आर. डी. लांडे, ‘नासुप्र’चे अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, ‘नामप्रविप्रा च्या अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता अनिल पातोडे, कार्यकारी अभियंता संजय चिमुरकर, आणि कार्यकारी अभियंता अनिल राठोड, कार्यकारी अभियंता पोहेकर, कार्यकारी अभियंता मेघराजानी, विधी अधिकारी प्रियका इरखेडे, जनसंपर्क अधिकारी अविनाश गंधे तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. मंगळवार , दिनांक 09 ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम नासुप्र/नामप्रविप्रा कार्यालयात राबविण्यात येणार आहे.