नागपुरा – नागपुरातील प्रसिद्ध अनेस्थिशिया अर्थात भुलतज्ञ डॉ. अशोक जाधव (एम डी) यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते. डॉ.अशोक जाधव हे अनेक दिवसांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. डॉ.अशोक जाधव यांनी तब्बल 40 वर्षे नागपूरात विविध रुग्णालयात भुलतज्ञ (अनेस्थिशिया स्पेशालिस्ट) म्हणून कार्य केले. ते नागपूरात विविध वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत संघटनांशी जुडले होते. डॉ. जाधव यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एम.बी.बी.एस. तसेच एम.डी. (अनेस्थिशिया) चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तेथेच अनेक वर्षे भुलतज्ञ म्हणून कार्यरत होते. चांदुर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले स्व. भाऊसाहेब जाधव यांचे ते द्वितीय चिरंजीव होते. तर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री स्व.एन.यु.देशमुख यांचे ते जावई होते. अतिशय शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे डॉ.अशोक जाधव यांना नागपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात IMA तर्फे आयोजित प्रार्थना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नागपुरातील अनेक नामवंत डॉक्टर सहभागी झाले होते. डॉ.अशोक जाधव यांच्या मागे त्यांचा पत्नी डॉ. वर्षा जाधव, मुलगी डॉ.जुई व जाई, तीन भाऊ, दोन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे
नागपुरातील प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ.अशोक जाधव यांचे निधन, IMA ने प्रार्थना सभेत वाहिली श्रद्धांजली.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com