नागपूर :- महावीर जैन यांचे सिद्धांत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र सरकारतर्फे ‘भगवान महावीर २५५० वा निर्वाण कल्याणक महोत्सव समिती’ तर्फे भगवान महावीरांच्या जीवन चारित्र्यावर आधारीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वाधिक सहभागिता श्रेणीमधुन राज्यस्तरावर ‘नागपुर’ जिल्ह्याने ‘तिसरा क्रमांक’ पटकावला असून जिल्हा नियोजन कार्यालय नागपूर येथे मंगळवारी (ता. २५) रोजी महाराष्ट्र सरकारतर्फे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेत जिंकलेल्या शालेय विध्यार्थाचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी मनपा अति.आयुक्त अजय चारठाणकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, समितीचे सदस्य निखिल कुसुमगर, अनिल जैन, पायल मेहता, प्रफुल पारेख, ॲड .प्रीती रांका, रिचा जैन, नवकार बचत गट यांच्यासह इतर शालेय विध्यार्थी उपस्थित होते.
भगवान महावीर स्वामींच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त, महाराष्ट्र सरकारतर्फे भगवान महावीर स्वामींच्या चरित्रावर आधारित भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील १,०४,००० शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात ५ ते ७ वर्ग व ८ ते १० व्या वर्गाच्या विविध शाळेतील विध्यार्थानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या जीवनात भगवान महावीरांची अहिंसा, विश्वास आणि भक्तीची तत्त्वे रुजविणे हा होता. या स्पर्धेमुळे विध्यार्थ्यानी भगवान महावीर स्वामींची पुस्तके वाचली. त्यांचे विचार- मूल्ये समजण्याचा प्रयत्न केला व विध्यार्थ्यानी ते निबंधात उतरविले.
या स्पर्धेत पहिले पारितोषिक कोल्हापूर जिल्ह्याने, दुसरे पारितोषिक नाशिक जिल्ह्याने आणि तिसरे पारितोषिक नागपूर जिल्ह्याने जिंकले आहे. या स्पर्धेत नागपूर जिल्हा पातळीवरही अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये प्राची ओमप्रकाश बिसेन, पूर्वी गेडाम, मानसी कलसुरे, कुशांक देशमुख, इशिता सरदकर , वेंकट डोंपाला, आराध्या जैन, स्वरा गोइरखडे, मानसी रामटेके आणि मोक्षदा टेंबुरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.