महिला परिषदेने नागपूर दीक्षाभूमी दुमदुमली

नागपूर :- बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी केलेल्या कल्पप्रवर्तनाच्या भूमीवरून म्हणजेच नागपूरच्या दीक्षाभूमीवरून, तिसऱ्या महिला परिषदेच्या माध्यमातून मानवतावादी विचारांची मशाल पेटवून महिला परिषदेद्वारे समतेचे रणशिंग फुंकल्या गेले.

“कहीं हम भूल न जायें” या अभियानाच्या माध्यमातून रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी तिसऱ्या महिला परिषदेचे भव्य स्तरावर आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी, नागपूर येथे करण्यात आले होते. महिलांनी दहाडणाऱ्या वक्तव्यांमधून “करारा जवाब” दिला सुमती भार्गवाला. क्रांतिकारी महिला प्रतिनिधींच्या त्या गगनभेदी निश्चयांनी व प्रतिज्ञांच्या भिमगर्जनांनी दीक्षाभूमी दुमदुमली.

परिषदेचे सभागृह गर्दीने भरगच्च भरून ओसंडून वाहत होते. तरीही सर्व परिषद अतिशय शिस्तीमध्ये पार पडली. जवळपास अकराशे सदस्यांनी सदर परिषदेला हजेरी लावली. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरूनही महिला प्रतिनिधींनी सदर परिषदेमध्ये वक्तव्य ठेवत नियोजित विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली.

परिषदेचे अध्यक्ष आंबेडकरवादी आंदोलनाचे अभ्यासक ॲड. अतुल व्ही. पाटील होते.समतेचा लढा यशस्वी करून चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांचा भारत घडवण्यासाठी महिला वर्गाने कसोशीने प्रयत्न करावा व फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीत भाग घ्यावा असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात ॲड. अतुल व्ही. पाटील यांनी केले. एडवोकेट अश्विनी मून यांनी महिला परिषदेचे मुख्य मार्गदर्शन केले.

परिषदेचे सूत्रसंचालन मेघा काळे व इंजि. जयश्री रत्नपारखी यांनी केले. प्रस्तावना पूजा रंगारी यांनी मांडली. सदर महिला परिषदेत, नागपुरच्या- वैशाली गजभीये, चैताली रामटेके, ॲड. अमिता फुले, रोशनी गजभिये, हिमा साखरे, साधना आवळे, स्नेहल शिंगाडे, अंजु ब्राह्मणे, कुमुद ढोके, मैत्री नाखले, खापरखेडाच्या- सरीता सोमकुंवर, स्विटी वाहाने, शितल चाहारे, वर्धाच्या डॉ. विद्या राईकवार, चंद्रपुरच्या – काजल मेश्राम, डॉ. संगीता बोदलकर, शालिनी कांबळे, एकता मेश्राम, माधवी बोरकर, सोनाली चाहांदे, वैशाली खंडारे, भाग्यश्री तागडे, सिंदेवाही चंद्रपुरच्या- ज्योती खोब्रागडे, दिल्लीच्या प्राजक्ता दहाट, भंडाराच्या स्वाती गणवीर, अमरावतीच्या जया वानखडे इत्यादी महिला प्रतिनिधींनी अतिशय अभ्यासपूर्ण आपले वक्तव्य ठेवले. परिषदेचे आभार प्रदर्शन वृषाली मुन यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM के DIGITAL INDIA का NAGPUR में विरोध 

Wed Sep 13 , 2023
– शहर भाजपा कार्यकारिणी के विशेष निमंत्रित सदस्य नरेंद्र उर्फ़ बाल्या बोरकर DIMTS को पुनः EXTENSION दिलवाने और नए TENDER को रद्द करवाने के लिए कर रहे जी तोड़ मेहनत   नागपुर :- आर्थिक नुकसान,घूसखोरी,पैसे की हेराफेरी को रोकने व सरकारी राजस्व का सदुपयोग सह लाभार्थियों को शत-प्रतिशत लाभ दिलवाने के लिए इंडिया/भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की DIGITAL INDIA की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com