नागपूर :- नागपूर पोलीस आयुक्तालय च्या वतीने रविवार, दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० वा “नागपूर सायक्लोथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूर शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश अमली पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत जनजागृती करणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देणे, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी संदेश देणे आहे.
सायक्लोथॉन मार्ग:-
सिव्हिल लाईन्स येथील पोलीस जिमखाना, वॉकर स्ट्रीट येथून सुरू होणारी ही सायक्लोथॉन पुढील मार्गाने जाणार आहे:
-पोलीस जिमखाना वॉकर स्ट्रीट – तेलंगखेडी मंदिर – वायुसेना नगर गेट, टीव्ही टॉवर, सेंटर पॉइंट स्कूल (सेमिनरी हिल) – जापनीज गार्डन चौक – सदर पोलीस स्टेशन – व्हीसीए चौक – आकाशवाणी चौक – महाराज बाग गेट – जैन मंदिर – काचीपुरा चौक – अलंकार टॉकीज चौक – भोले पेट्रोल पंप चौक – जीपीओ चौक – न्यू आरबीआय – आयकर भवन वळण – जापनीज गार्डन चौक – वॉकर स्ट्रीटमार्गे पोलीस जिमखान्याजवळ समाप्त होईल.
अनिवार्यता :-
सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी. नागपूर शहरातील युवक, महिला, खेळाडू आणि नागरिकांनी या जनजागृती उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.