नागपुर – वर्षानुवर्ष असणारी रचना मोडून कुलपतींचे अधिकार कमी करून आता शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती म्हणून अधिकार देण्याचा घाट महा विकास आघाडीने घातला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विषयात अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून ही लढाई विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून लढण्यासाठी भाजयुमो सज्ज आहे..
विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी ‘काळे विधेयक होळी आंदोलन ‘ करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ येथे प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामन तुर्के, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधेयकाची होळी करण्यात आली.भाजयुमो पदाधिकारी,कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो पर्यंत हे काळे विधेयक मागे घेत नाही तो पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा चा हा संघर्ष सुरूच राहील असे भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांनी म्हंटले.