नागपूरचे भारत बोदडे ‘महापौर श्री २०२२’चे मानकरी

महापौरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान : विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा

नागपूर : इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन संघटनेच्या मान्यतेने नागपूर महानगरपालिका व बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये पोलिस विभागात कार्यरत नागपुरातील भारत बोदडे ‘महापौर श्री २०२२’चे मानकरी ठरले. वर्धा येथील पंकज ढाकुलकर यांना ‘बेस्ट पोजर’ म्हणून गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छी विसा परिसर येथे शुक्रवारी (ता.४) विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ‘महापौर श्री-२०२२’ चे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, स्पर्धेचे संयोजक नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार अनिल सोले, उपमहापौर मनीषा धावडे, लकडगंज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग पोटे, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, नगरसेविका कांता रारोकर, मनीषा अतकरे, सरिता कावरे, मनीषा कोठे, वैशाली रोहनकर, चेतना टांक, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे मागील ७ वर्षांपासून नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर हे नियमित विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून विदर्भातील शरीर सौष्ठवपटूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो व ८० किलोच्या वर या सहा वजनगटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील एकूण ९३ स्पर्धेकांनी सहभाग घेतला. प्रत्येक वाजनगटात एकूण ५ बक्षिसे होती. प्रत्येक गटात

पहिले बक्षीस २० हजार रुपये, दुसरे १५ हजार रुपये, तिसरे १० हजार रुपये, चवथे ७ हजार रुपये, पाचवे ५ हजार रुपये विजेत्यांना प्रदान करण्यात आले.

नागपूरचा भारत बोदडे हा ‘महापौर श्री-२०२२’ चा मानकरी ठरला त्याला. ५१ हजार रुपये रोख व चषक देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गौरवान्वित केले. ‘बेस्ट पोजर’ वर्धा येथील पंकज धाकुलकर यांना ३१ हजार रुपये रोख  व चषक देऊन गौरव करण्यात आला.

परीक्षणाची जबाबदारी विदर्भ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली. संघटनेचे महासचिव अभिषेक करिंगवार, उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, विशाल शिंदे, खेमराज हिवसे, मनोज लिखार, दिनेश चवरे, टिकू शिंदे, राजू कोटेवार, प्रीतम पाटील, विवेम बुरडकर, योगेश देवतळे, किशोर आदमने, सुभाष लांजेकर, विशाल मरडवार, नितीन गावंडे, गणेश रामगुंडेवार, स्वप्नील वाघुले व अविनाश वाघुले आदी परीक्षकांनी अंतिम निकाल जाहीर केला.

विशाल मराडवार व गणेश रामगुंडेवार यांनी स्टेजमार्शलची जबाबदारी सांभाळली.

इतर गटातील विजेते

(अनुक्रमे पहिले पाच)

६० किलो वजनगट

राजेश क्षीरसागर (यवतमाळ), सुरज बोधिले (अमरावती), सलीम शेख (अकोला), किरण ठाकरे (चंद्रपूर, नावेद शेख (अमरावती).

६५ किलो वजनगट

योगेश बन्सोड (अकोला), अक्षय टिकेकर (अमरावती), शुभम यादव (अकोला), शुभम बागडे (यवतमाळ), हर्ष शाहु (नागपूर).

७० किलो वजनगट

योगेश शेंडे (नागपूर), अक्षय गानेर (नागपूर), विक्रांत गोडबोले (नागपूर), अक्षय इकोनकर (अमरावती), सुयश जदिवे (अकोला).

७५ किलो वजनगट

प्रसाद थोटे (अमरावती), आलेख चौधरी (नागपूर), सोयब अली(अकोला), राज अटकापुरवार (चंद्रपूर), मोनिष ठाकुर (नागपूर).

८० किलो वजनगट

पंकज ढाकुलकर (वर्धा), रोहित मोरे (चंद्रपूर), शशांक शेंडे (नागपूर), बिलाल शेख (नागपूर), सलमान शेख (नागपूर).

८० किलोवरील वजनगट

भारत बोदडे (नागपूर), कमलेश कश्यप (चंद्रपूर), आकाश राजपूत (अमरावती), निनेश जोशी (नागपूर), किसन तिवारी (नागपूर)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सहायक साधने वाटप तपासणी शिबिराला गांधीबाग झोनमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Sat Mar 5 , 2022
दिव्यांग व वयोश्री योजनेसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिर नागपूर, ता. ०५ : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाद्वारे एडीआयपी, दिव्यांग आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहायक साधने वाटपासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. शनिवारी (ता.०५) गांधीबाग झोन येथील गांधीबाग उद्यानात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर रविवार ६ मार्च रोजीसुद्धा राहील. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com