नागपूर :- जिल्हा बार संघटना नागपूर डाका यांच्यामार्फत कोरोणा महामारी दरम्यान मृत्युमुखी झालेले किमान ८० वकिलांना आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली….
सचिव ॲड नितीन देशमुख यांनी कोविड महामारी दरम्यान डी.बी.के मार्फत केलेले मदत कार्य तसेच व्यवस्थे वर मनोगत व्यक्त केले. ॲड कमल सुतुजा यांनी कोवीड महामारीत करण्यात आलेली मदत तसेच भविष्यात येणाऱ्या धोक्याला लक्षात घेऊन पूर्व तयारी वर भर देत म्हणाले की मेडीक्लेम इन्शुरन्स सुरू करणार तसेच वकिलांना आकशमित निधी सारखी योजना तयार करणार इत्यादी बाबींवर मनोगत व्यक्त केले….
या कार्यक्रमात डाका चे सचिव ॲड नितीन देशमुख , डी.बी.ए अध्यक्ष ॲड. कमल सुतुजा , सचिव ॲड महेंद्र बनसोड , उपस्थीत होते…
डेमोक्रॅटिक अडवोकेट्स असोसिएशन फोर कन्स्टीट्यूशनल ॲक्शन ( डाका) च्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत केली…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन ॲड नरेंद्र वैद्य यांनी केले.
-दिनेश दमाहे
9370868686