संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- बौद्ध इतिहास आणी सस्कृती संशोधन संस्था संचालित संग्राहक दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालय च्या नवनिर्मित ईमारत लोकार्पण समारोह शनिवार दिनांक १८मे ला जागतीक म्युजियम दिन चे औचित्य साधुन भीक्खुसंघातील भदंन्त नाग दिपंकर महास्थविर संस्था अध्यक्ष व विश्वस्त परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दींक्षाभूमी नागपुर यांचे अध्यक्षतेखाली व भदंन्त प्रज्ञाज्योती महास्थविर सचिव बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार, भदंन्त ज्ञानबोधी महास्थविर सचिव आलोका ट्स्ट आलोका संघाराम महाविहार, डाॅ भदंन्त सीलवंस महास्थविर सचिव बोधिमग्गो सेवा संस्था बोधिमग्गो महाविहार याचे मार्गदर्शनात मातोश्री अनुसयाबाई लक्ष्मणराव वानखेडे यांचे हस्ते रितसर संम्पन्न झाले.
प्रमुख अतिथि पुर्व नगर सेवक द्वय प्रतिक पडोळे, स्वर्णलता गजभिये, समाज सेवक गौतम माटे, प्रा, सुधा महिले डांगे, सुजाता संघरंक्षीत पिल्लेवान, दिग्दर्शक सुबोध नागदेवे, एडवोकेट जिजा वाहाणे, प्रदिप फुलझेले, नामदेवराव पक्खिड्डे, एस एस सहारे, वसुंधरा भोसेकर, अशोक थुल,अशोक वानखेडे प्रमोद टेभुर्णे शुद्धोधन धनिराम पाटील चंदु पाटील, ओमप्रकाश टेभुर्णे आदी उपस्थित होते उपरोक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्षा कल्पना दिलिप वानखेडे यांनी केले,सुत्र संचालन सचिव कुलदीप वानखेडे, आभार प्रदर्शन व्यवस्थापक हर्षवर्धन वानखेडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता अनिल बेदले,अविनाश वानखेडे, अशोक पाटील, प्रकाश कुर्वे,नितीन वंजारी,निखिल भोसेकर, धम्मदिप वंजारी महेंद्र वंजारी संजु वानखेडे,प्रियंका वानखेडे,प्रिती पाटील आदिंनी प्रयत्न केले उपरोक्त कार्यक्रम निमित्त बोधि वाचनालय पटांगणात नागार्जुन संग्रहालय च्या वतिने दान दिलेल्या थायलंड वरूण आणलेल्या तथागत बुद्ध मुर्ती स्थापीत करण्या करीता सुसज्जित चबुतरा बाधकाम चे भुमी पुजन मान्यवर चे हस्ते करण्यात आले या निमित्त मोठ्या संख्येत विविध क्षेत्रातील मान्यवर परिसरातील जनसामान्य नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या उदबोधनातुन स्मृतीशेष दिलीप वानखेडे यांनी काटेरी संघर्षातुन अविरत निस्वार्थ तत्पर राहुन आपल्या श्रमसाफल्यातुन हजारो विविध मुद्रेतील लहानमोठ्या विविध धातुच्या हजारो बुद्ध मुर्त्या,ऐतिहासिक धरोहर वस्तु, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध मुद्रेतील फोटो, वापरातील वस्तु हजारो क्वाईन, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद असलेले अविस्मरणीय ऐतिहासिक धरोहर संग्रहित केले उपरोक्त संग्रहालयास भेट देऊन अवलोकन करण्याकरिता पुणे स्टेशन जवळील डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील संग्रहालय व कुंभारे कामगार काॅलोनी बोधी वाचनालय परिसर ड्रैगन पॅलेस मागे न्यु कामठी येथे यावे असे आवहान करण्यात आले.