हिंगणा :- फिर्यादी अलका दिनेश नगराळे, वय ४१ वर्षे, रा. वडगांव गुजर, पोस्ट गुमगांव, तह हिंगणा, जि. नागपुर यांचे पती नामे दिनेश हरीदास नगराळे, वय ५० वर्षे हे टेंभरी बुट्टीबोरी, नागपुर येथे ऑटो चालविण्याचे काम करीत असून, ते दिनांक १३.०६.२०२४ चे ०७.३० वा. चे सुमारास त्यांचे दुचाकी सलेंडर प्लस एम.एच. ४० क्यु. ४२८६ ने ऑटो चालविण्याकरीता गेले असता, ते सायंकाळी घरी परत आले नाही. गावातील भुषण कापसे, वय २० वर्षे आणि सचिन खिरडकर, वय २३ वर्षे, यांनी फिर्यादीचे घरी येवुन सांगीतले की, फिर्यादीचे पती समृध्दी महामार्ग ते वडगांव गुजर गावाजवळील कन्या रोडवर जखमी अवस्थेत पडलेले आहेत. फिर्यादी यांनी त्या ठिकाणी जावुन पाहीले असता, त्यांचे पतीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जिवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यावर व शरीरावर कोणत्यातरी शस्त्राने गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी जखमी यांना उपचाराकरीता एम्स हॉस्पीटल येथे नेले असता, त्यांना डॉक्टरांनी तपासुन मृत मोषीत केले होते फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०२ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल होता.
गुन्हेशाखा युनिट क. १ वे अधिकारी व अंमलदार यांनी सायबर सेल ने मदतीने तांत्रीक तपास करून तसेच, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून आरोपींना निश्पण्ण केले व सापळा रचुन गुन्ह्यातील आरोपी क. १) प्रभाकर उर्फ बालु नारायण शिवरकर, वय ३४ वर्षे, रा. टाकळघाट, २) अमोल बारसुजी बारसे, वय २७ वर्षे, रा. सातगांव दुधाळा, बुटीबोरी ३) मंगेश विष्णुजी उईके, यय ३० वर्षे, रा. सावरगाव, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, आरोपींनी नमुद गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीना पुढील तपासकामी हिंगणा पोलीसांचे ताच्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागुपर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, सुहास चौधरी, सपोनि सचिन भोडे, पोहया, नितीन वासनिक, बबन राऊत, सुमित गुजर, हेमंत लोणारे, विनोद देशमुख, सोनु भावरे, योगेश वासनिक, रितेश तुमडाम, शरद चांभारे, चंद्रशेखर भारती, पोज शिवशंकर रोठे, स्वप्नील खोडके, रविंद्र राऊत व नितीन बोपुलकर यांनी केली.