मनपा कर्मचाऱ्यांनी मानले आयुक्तांचे आभार

– वाहतूक व महागाई भत्ता थकबाकी आणि पदोन्नतीबाबत निर्णयाचे केले स्वागत

नागपूर :- नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी तसेच पदोन्नती बाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयाकरिता मनपा कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार मानले. मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सहायक आयुक्त  श्याम कापसे, मनपा आयुक्तांचे स्वीय सहायक प्रमोद हिवसे, जितेश धकाते, मुकेश मोरे यांनी मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देउन त्यांचे आभार मानले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता व महागाई भत्ता थकबाकी आणि पदोन्नतीबाबत प्रलंबित विषयावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे मनपा कर्मचाऱ्यांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला.

मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देताना त्यांच्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांनी आभार मानले. यावेळी सर्वश्री अमोल तपासे, कमलेश झंझाड, शुभम राऊत, मनीष डुमरे, राजू लोणारे, गजानन जाधव, शैलेश जांभुळकर, राजेश लोहितकर, कीर्ती उबाळे, कैलाश लांडे, अनिल चव्हाण यांच्यासह आस्थापना विभाग, आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालयासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NADP AND DR. REDDY’S LABORATORIES JOIN FORCES FOR HEALTH AWARENESS INITIATIVE

Wed Oct 2 , 2024
Nagpur :-National Academy of Defence Production (NADP), a unit of Munitions India Limited under the Ministry of Defence, Government of India, has signed a Memorandum of Understanding (MoU) with Dr. Reddy’s Laboratories Limited (DRL) to promote health awareness among employees of Ordnance Factories. This collaboration, under the umbrella of Dr. Reddy’s Foundation for Health Education (DRFHE), aims to spread awareness […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!