प्रत्येक झोन मधे सेवा पंधरवाड़ा अभियान अंतर्गत सेवा शिबिर लावले जाणार
चंद्रपूर :- राज्य शासनाच्या सुचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत १० सप्टेंबर २०२२ पर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे जर नागरिकांचे काही प्रलंबित अर्ज, तक्रारी असतील तर ते निकाली काढण्याचे निर्देश २० सप्टेंबर रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी दिले आहेत.
यासाठी मनपाच्या सर्व विभागांनी नियोजन करावे. प्रत्येक झोननिहाय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे, या विशेष शिबिरात शासनाच्या विविध योजना जसे पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, एकल खिडकी, विवाह नोंदणी, जन्म – मृत्यु प्रमाणपत्र, मालमत्ता कर,बचतगट कर्ज, दिव्यांग ओळखपत्र, आरोग्य शिबीर, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रमाणपत्र, नवीन नळ जोडणी इत्यादींशी प्रलंबित प्रकरणांचे निराकरण केले जाणार आहे. तसेच संबंधित विभागाच्या पोर्टलवर प्रलंबित असलेले अर्ज, विविध माध्यमातुन प्राप्त झालेल्या तक्रारी १० सप्टेंबर २०२२ पर्यंत १०० टक्के निकाली काढण्यासाठी सर्वांनी विभागांनी गांभीर्याने काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.