नागपूर :- दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी व्हीसीए स्टेडीयम जामठा येथे भारत वि. इग्लंड एक दिवसीय सामन्याच्या दिवशी नागपूर शहर परिसरातील वाहतुक कोंडी रोखण्यासाठी महानगरपालिका सज्जआहे. याकरीता विशेष बस सेवेचे आयोजन करण्यात येत आहे.परिवहन विभाग, मनपातर्फे नागपूर शहरातील व शहराबाहेरुन येणाऱ्या प्रेक्षकांना एक दिवसीय सामना पाहण्यासाठी शहरबसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर्हु शहरबस सेवा ही पंचशिल चौक, सिताबर्डी येथुन जामठा स्टेडीयम करीता सकाळी 9.00 वाजेपासुन ते रात्री उशीरापर्यंत दर 15 मिनिटांच्या अंतराने सुरु राहतील. या सामन्याकरीता पुरविण्यात येणाऱ्या बसेस नियमित तिकीट दराने चालविण्यात येईल. जामठा स्टेडीयम परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या बघता प्रेक्षकांना ऑनलाईन बस तिकीट मोबाईलवर चलो ॲप व्दारे सामन्याच्या आदल्या दिवशी व सामन्याच्या दिवशी आगाऊ बुक करुन ठेवता येईल व ऑनलाईन तिकीट सदर मार्गावरील कोणत्याही बसमध्ये कंडक्टरला दाखवून सुलभ प्रवास करता येईल. या व्यतिरीक्त प्रवाश्यांच्या सोयीसाठी जामठा टी-पॉईट जवळ स्पॉट तिकीट बुकींगची व्यवस्था सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रेक्षकांना आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त प्रमाणात शहर बसेसचा वापर करावा. जेणेकरुन प्रेक्षकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही व सामना स्थळी वेळेवर पोहचणे शक्य होईल.
याशिवाय सिताबर्डी येथुन वाडी, कोराडी, काटोल नाका, कामठीव पारडी या ठिकाणी रात्री आवश्यकते नुसार बसेस उपलब्ध करुन देण्यात येईल.
दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या सामन्याकरीता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (भाप्रसे) यांनी बस सुविधेकरीता स्वतंत्र कक्ष स्थापीत केलेला असुन बस सेवेसंबंधी कुठलीही अडचण आल्यास सचिन गाडबैल (मो. 7709955055) व प्रविण सरोदे (मो. 9765978406) यांचेशी संपर्क साधावा.