मनपा नागपूर – महिला व बालकल्याणासाठी तत्पर

– वर्ष 2024-25 मध्ये 5 % राखीव निधी मधून होणारा सर्वांगीण विकास

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे वर्ष 2024-25 करीता महिला व बाल कल्याणासाठीच्या योजना राबविण्याकरीता 5% निधी म्हणजेच रुपये 12.50 कोटी राखीव ठेवण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्यामध्ये खालील योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे:-

1. शिवणयंत्र वाटप योजना 6. मुलींना शाळेकरीता उपस्थिती                                         भत्ता व अर्थसहाय्य योजना

2. महिला उद्योजिका मेळावा 7. महिलांकरीता समुपदेशन केंद्र

3. सॅनेटरी नॅपकीन वाटप योजना 8. महिला/बालक बस                                          प्रवासी पास उपलब्ध करुन देणे

4. फुड स्टॉल वाटप योजना 9. विज्ञान प्रयोगशाळानुतनीकरण                                       (सायन्स लॅब) नुतनीकरण

5. महिलांकरीता शहरी बेघर निवारा 10. बालवाडी – पोषक                                                          आहार

वरील योजनांच्या माध्यमातुन महिला बचत गटातील महिलांना त्यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल याचे नियोजन करण्यात येत आहे व वैयक्तिक स्तरावर महिलांना स्वावलंबी बनविण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत. महिला उद्योजिका सण/उत्सवाच्या दिवशी घेण्याचा व प्रत्येक मनपा कार्यालयात फुड स्टॉल या माध्यमातुन महिलांकरीता चांगले व सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

नाविन्यपुर्ण योजनांमध्ये नागपूर पोलीस व मनपा मार्फत महिलांसाठी Helpline व समुपदेशन केंद्र सुरु करण्याचे विचाराधीन आहे. तसेच मुलींचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी मनपा शाळेतील मुलींची उपस्थिती 80% पेक्षा जास्त असली तर रु. 4000/- प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. शाळेतील मुलींना सायकल वाटप व महिला व बालकांचे मनपा बस वाहतुकीमध्ये प्रवासी पास दिले जाणार आहे. मनपातील बालवाडयांमध्ये शिकणारे गरजु मुले यांना पोषकआहार ची व्यवस्था मनपा मार्फत मा. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात प्रथमत: करण्यात येत आहे.

या शिवाय दुर्लभ आजाराने ग्रासलेल्या महिलांना अर्थसहाय्य, महिला खेळाडुंना अर्थसहाय्य व मुली/महिला करीता स्वयं रक्षणासाठी कराटे प्रशिक्षणसुध्दा येत्या दिवसांमध्ये योजिले आहे.

उपरोक्त योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यींना घ्यावा असे आवाहन आयुक्त यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्व. वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

Tue Jul 2 , 2024
नागपूर :- दीर्घकाळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी राहुन आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अति. आयुक्त  अजय चारठाणकर यांनी मनपा केंद्रिय कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, परिवहन व्यवस्थापक तथा सहा. आयुक्त गणेश राठोड, डॉ. विजय जोशी, सहा. अधिक्षक धनंजय जाधव, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com